🕒 1 min read
Sachin Sawant | मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या सीबीआय (CBI) प्रकरणात जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात काल सुनावणी झाली. अनिल देशमुख यांचा जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ईडीनंतर आता सीबीआय प्रकरणातही अखेर जामीन मंजूर झालाय. कोर्टाकडून अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मोठा दिलासा मिळालाय.
१०० कोटी वसुली प्रकरणामध्ये देशमुखांवर खोटे आरोप केल्याचा युक्तीवाद देशमुख यांच्या वकिलांनी केला आहे. न्यायालयाच्या निकालावर काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी यावर प्रतिक्रिया देताना भाजपावर टीका केली आहे. अनिल देशमुख हे भाजपाच्या विखारी राजकारणाचे बळी असल्याचं सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी म्हंटल आहे.
.@AnilDeshmukhNCP यांना जामिन मिळाला याचे समाधान आहे. भाजपाच्या विखारी राजकारणाचे ते बळी आहेत. विरोधकांमध्ये भीती पसरविण्यासाठी १२० धाडी टाकल्या व आतच ठेवण्याचा प्रयत्न केला. खूनाच्या आरोपीला माफीचा साक्षीदार व नं १ ला संरक्षण हे गेल्या ८ वर्षांत देशातील विदारक चित्राचा भाग आहे
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 12, 2022
“अनिल देशमुख यांना जामीन मिळाला याचे समाधान आहे. भाजपाच्या विखारी राजकारणाचे ते बळी आहेत. विरोधकांमध्ये भीती पसरविण्यासाठी १२० धाडी टाकल्या व आतच ठेवण्याचा प्रयत्न केला. खूनाच्या आरोपीला माफीचा साक्षीदार व नं १ ला संरक्षण हे गेल्या ८ वर्षांत देशातील विदारक चित्राचा भाग आहे.” असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे.
काय आहे प्रकरण?
अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. मुंबईतील मोठ-मोठे डान्स बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून दर महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल केरण्याचे आदेश देशमुखांनी दिले असल्याचा धक्कादायक आरोप परमबीर सिंग केला होता. याबाबतचे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालकांना पाठवण्यात आलं होतं. राज्याच्या राजकारणात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. तर या प्रकरणामुळे विरोधकांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे देशमुखांनी त्यांच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
पुढे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली होती. ईडीने अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला होता. देशमुख यांनी मुंबईतील विविध बार आणि रेस्टॉरंटमधून सुमारे ४.७ कोटी रुपये गोळा केले. यासोबतच देशमुख यांनी चुकीच्या पद्धतीने कमावलेली रक्कम नागपुरातील श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या शैक्षणिक ट्रस्टला पुरवल्याचा आरोप ईडीने केला होता. या तपासादरम्यानच देशमुख यांना ईडीने नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक केली होती, तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Pawar | रोहित पवारांचा गनिमी कावा, बेळगावात दाखल! शिवरायांच्या पुतळ्याला केले अभिवादन
- KL Rahul & Athiya Shetty | केएल राहुल आणि अथिया शेट्टी ‘या’ दिवशी बांधणार लग्नाची रेशीमगाठ
- Periods | मासिक पाळीदरम्यान अचानक जास्त रक्तस्त्राव का होतो? जाणून घ्या
- Sharad Pawar | शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, अज्ञात व्यक्तीने केला फोन
- Pathaan | ‘या’ कारणामुळे शाहरुख-दीपिकाच्या ‘पठाण’वर प्रेक्षक संतप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

