Share

‘तेव्हा तुमचे 2 खासदार सायकलवरुन संसदेत जात होते ते विसरलात काय?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त रविवारी मुंबईत पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शरद पवार पंतप्रधान व्हावे असे सूर त्या कार्यक्रमामध्ये उमटले होते. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली. देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

शरद पवार सर्व राजकीय पक्षांना एकजूट आणण्याचे काम करतील. विरोधकांच्या एकजूटीमुळे मोदी सरकार सत्तेतून बाहेर जाईल. देवेंद्र फडणवीस तुम्ही शाळेत होते तेव्हा 1984 साली लोकसभेची निवडणूक झाली होती. त्यावेळी तुमचे दोनच खासदार होते. ते एका सायकलवरुन डबलसीट पार्लमेंटमध्ये जात होते. हे तुम्ही विसरलात का?, असा सवाल यावेळी नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी फडणवीसांनी सांगितले होते की, पवारसाहेबांचे राजकारण संपलेले आहे. जेव्हा देवेंद्र फडणवीस टीका करतात तेव्हाच चमत्कार घडतात. 2024 ला आम्ही चमत्कार घडवून आणू, असे नवाब मलिक म्हणाले आहेत. ‘फक्त शरद पवारच विरोधकांना एकत्र आणतील आणि विरोधकांच्या एकजुटीमुळे मोदी सरकार सत्तेतून बाहेर जाईल’, असेही नवाब मलिक म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!