🕒 1 min read
बेळगाव : बेळगाव प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी(Deepak Dalavi) यांच्या अंगावर शाई फेकल्याने येथील मराठी जनतेत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या प्रकरणाच्या निषेधार्ध कार्यकर्त्यांकडून उद्या बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे.
आज(१३ डिसें.)बेळगावमध्ये कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन सुरु होत असून या अधिवेशनाला विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती प्रत्येक वेळी महामेळावा भरवते. यंदाही या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. परंतु,यावेळी अचानक कन्नड म्युझिक संघटनेच्या काही लोकांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकली. त्यामुळे बेळगावचे वातावरण चांगलेच चिघळल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेचा निषेध म्हणून मंगळवारी(१४ डिसें.) बेळगाव बंदचा निर्णय महाराष्ट्र एकीकरण समिती केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…ही संकटाची चाहूल तर नाही ना , याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावेच लागेल’
- भाजप कार्यकर्त्यांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून; राऊतांविरोधात दिल्लीत तक्रार दाखल
- सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपाला सांगितला राऊतांनी उच्चारलेल्या ‘त्या’ शब्दाचा अर्थ
- ‘मलिकांचे गुडगोईंग म्हणून कौतुक करणारे मुख्यमंत्री आव्हाड आणि टोपेंबाबत पक्षपात करत आहेत का?’
- दिल्लीत तक्रार दाखल झाल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले,’मी जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थ…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
