औरंगाबाद : संपूर्ण महाराष्ट्रात म्हाडाच्या विविध पदांकरिता परीक्षा आयोजित केली होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra Awahad) यांनी मध्यरात्री ऑनलाईन पध्दतीने परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे. परंतु हजारो विद्यार्थी बसेस बंद असताना प्रवास करत परीक्षा केंद्रावर उपस्थित आहेत. शासन ठरवून विद्यार्थ्यांचे आर्थिक, शैक्षणिक व मानसिक नुकसान करत आहे का? असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना निर्माण झालेला आहे. याविषयी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने देवगिरी महाविद्यालयासमोर सरकारचा जाहीर निषेध केला व जितेंद्र आव्हाड याच्या राजीनाम्याची मागणी केली.
महिन्याभरापूर्वीच आरोग्य विभाग परीक्षेच्या गोंधळानंतर आता म्हाडाची परीक्षा ऐनवेळी रद्द केल्याने रविवारी (दि.१२) औरंगाबाद विभागातील हजारो विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. परीक्षा केंद्राबाहेर जमलेल्या उमेदवारांनी प्रवेशपत्र फाडून हवेत भिरकावून शासनाचा निषेध व संताप व्यक्त केला. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) ५६५ पदांच्या भरतीसाठी रविवारी (दि. १२) परीक्षा आयोजित केली होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री २ वाजता तांत्रिक कारणामुळे परीक्षा रद्द केल्याचे जाहिर केले.
बसेस बंद असतानाही म्हाडाच्या विविध पदासाठी परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवास केला. त्यात अचानकपणे परिक्षा रद्दचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. गैरव्यवहार प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करून, परीक्षेची सुधारित तारीख लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी महानगरमंत्री नागेश गलांडे यांनी केली. यावेळी महानगरमंत्री नागेश गलांडे, सहमंत्री ऋषिकेश केकाण, जिल्हा संयोजक महेश भवर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- सारा अली खान, जान्हवी कपूर, सारा तेंडूलकर यांना नाईट पार्टी पडली महागात!
- महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांना फासले काळे; कार्यकर्त्यांकडून उद्या बेळगाव बंदची हाक
- पेपरफुटी प्रकरणी अभाविप आक्रमक; जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर निदर्शने
- ‘तू अमिताभ सारखा..’ म्हणत नेटकऱ्यांनी केले अभिषेक बच्चनला ट्रोल
- ‘त्याने ५ वर्षे संघाची कमान सांभाळली आणि…’, कोहलीबाबत रोहितचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

