Share

‘विराट कोहली जो रूटच्या तुलनेत खूप पुढे आहे’, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचे विधान

Published On: 

नवी दिल्ली : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार जो रूट यांच्यातील तुलनेवर पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहली हा इंग्लिश कर्णधार जो रूटपेक्षा (Joe Root) खूप पुढे असल्याचे सलमान बटने म्हटले आहे.

जो रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या अॅशेस कसोटीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आणि त्यानंतर जो रूटच्या कर्णधारपदावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. सलमान बटनेही रूटच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सलमान बटने जो रूटच्या कर्णधारपदाची विराट कोहलीशी तुलना केली आणि भारतीय कर्णधार त्याच्यापेक्षा खूप पुढे असल्याचे सांगितले. सलमान बट त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, विरोधी संघाला आव्हान देण्याची वृत्ती विराट कोहलीची आहे. फलंदाजी करताना तो खूप आक्रमक असतो आणि ऑस्ट्रेलियन परिस्थितीत चांगली फलंदाजी करणे खूप महत्त्वाचे असते. विराट कोहली, अग्रेसन, एट्टीट्यूड आणि दृष्टिकोन या बाबतीत रूटच्या पुढे आहे.  जेव्हा रूट खूप धडपडत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता आणि विराट कोहलीच्या चेहऱ्यावर ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळत नाही. विराट कोहलीची बॉडी लँग्वेज रूटच्या तुलनेत खूपच चांगली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात इंग्लंड संघाला ९ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करण्याचे आव्हान इंग्लंडसमोर आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!