Share

…त्यामुळे साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याशी मोदींची तुलना नको- अतुल भातखळकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल(१२ डिसें.) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्यसभा खासदार शरद पवार(Sharad Pawar) यांचा आज ८१ वा वाढदिवस पार पडला. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांच्यासोबतच देशातील विविध राजकीय पक्षातील नेत्यांनीही पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या वेळी बोलत असतांना राष्ट्रवादीचे नेते व खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)म्हणाले की, ‘या देशाला शरद पवारांच्या मार्गदर्शनाची गरज आहे तसेच जर २६ खासदार असलेला गुजरात मधील व्यक्ति पंतप्रधान पदी बसू शकते, तर मग ४८ खासदार असलेला महाराष्ट्रातला महाराजांचा मावळा हा त्या सर्वोच्च स्थानी विराजमान का होणार नाही, हा विचार आम्ही प्रत्येकनी करणं गरजेचं आहे आणि ज्या दिवशी हे स्वप्न पूर्ण होईल त्या दिवशी खात्रीने सांगतो संसदेतल्या प्रांगणातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा या मराठी मातीतल्या सुपुत्राला त्या स्थानी बसल्यानंतर हसताना बसेल,’ असे यावेळी अमोल कोल्हे म्हणाले.

दरम्यान, कोल्हेंच्या या वक्तव्यावर भाजपचे कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली असून यासंदर्भात ट्विट करत ते म्हणाले की,’फरक आहे…पराभवाच्या भीतीने शरद पवार यांनी माढा मतदार संघातून माघार घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडून आले. त्यामुळे साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याशी मोदींची तुलना नको’, असे भातखळकर म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!