🕒 1 min read
लखनऊ : घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत माहिती मिळताच एटीएसने लखनऊचा काकोरी परिसराला सील ठोकले आहे. एटीएसला घराच्या आत लावलेल्या प्रेशर कुकर बॉम्बची माहिती मिळाली असल्याने बॉम्ब पथकही घटनास्थळी पोहोचले आहे.
सध्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसने या भागातून काही स्फोटक पदार्थ जप्त केले आहेत. तसेच एटीएसने या ठिकाणाहून दोन अतिरेक्यांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एक जण हा जुम्मूमधील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय आहे. तसेच दहशतवाद विरोधी पथकानं अल-कायदा संघटनेच्या दोन अतिरेक्यांना अटक केली आहे.
या दोन्ही अतिरेक्यांना पाकिस्तानातील दहशतवाद्यांकडून सूचना मिळत होत्या अशी माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही अतिरेक्यांची चौकशी सुरु असून सर्च ऑपरेशन सुरु आहे. एटीएस दोघांशिवाय आणखी अतिरेकी त्या भागात लपले आहेत का? याचा शोध घेत आहे. दरम्यान एटीएसला एका घरात कुकर बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली होती.
एटीएसकडून यासंदर्भात अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. एटीएसनं हा परिसर सील केला असून त्या परिसरात कोणालाही जाण्यास मनाई करण्यात आली आहे. परिसरातील कुटुबांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एटीएसकडून अधिक चौकशी सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या :
- मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद ; कोरोनाची तिसरी लाट रोखणार कशी?
- हरलीनच्या ‘त्या’ कॅचवर महिंद्रा यांची विशेष टिप्पणी, म्हणाले…
- मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद ; कोरोनाची तिसरी लाट रोखणार कशी?
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
- ‘तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगें’ धोनीसोबत मीही निवृत्ती घेणार, रैनाचं मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

