मुंबई : राज्यात १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. गेल्या तीन महिन्यात लसीकरण मोहिमेमध्ये देशात महाराष्ट्राची कामगिरी विक्रमी राहीली आहे. परंतु सध्या मुंबईमध्ये लसींचा तुटवडा जाणवत आहे. मुंबईत कोरोना लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर गेल्या तीन दिवसांपासून लसीकरण बंद आहे.
मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून लसीकरण बंद आहे. केंद्र सरकारकडून पालिकेला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत अस प्रशासनाच म्हणणं आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाची तिसरी लाट कशी थोपवता येईल? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या आधी जास्तीत जास्त लसीकरण होणं गरजेचं आहे. मात्र असे असतानाही मुंबईत कोरोना लसीकरणाला ब्रेक लागत आहे. त्यामुळे मुंबई महापालिका कोरोनाची तिसरी लाट कशी रोखणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लसींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘मैने खुद ये शहादत चुनी है’ ; अजय देवगनचा बहुचर्चित ‘भुज’चा टीझर रिलीज
- हरलीनच्या ‘त्या’ कॅचवर महिंद्रा यांची विशेष टिप्पणी, म्हणाले…
- सूर्यकुमार यादववर नाराज डेव्हिड वॉर्नर ; ट्विट करत म्हणला, ‘मला विश्वास बसत नाहीये’
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
- ‘तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगें’ धोनीसोबत मीही निवृत्ती घेणार, रैनाचं मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

