🕒 1 min read
मुंबई : झिंबाब्वे येथे बांग्लादेश आणि झिंबाब्वे संघादरम्यान कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात बांग्लादेशने पहिल्या डावात ४६८ धावांचा डोंगर उभा केला. बांग्लादेशच्या या डावात महमूदूल्लाहने दिडशतकी खेळी करत धावसंख्या उभारण्यास मोठा हातभार लावला.
मात्र या खेळीनंतर काही तासांतच महमुदूल्लाहने अचानक कसोटी क्रिकेटमधुन निवृत्ती जाहिर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. निवृत्तीच्या या निर्णयाबद्दल त्याने त्याच्या संघातील सहकाऱ्याना माहिती दिली आहे. मात्र त्याच्या या तडकाफडकी निवृत्तीने संघ व्यवस्थापन आणि सहकारी खेळाडू हैराण झाले आहे. त्याने हा निर्णय अचानक का घेतला याचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट करण्यात आले नाही.
BREAKING: Bangladesh allrounder Mahmudullah has made a shock decision to retire from Test cricket.
ESPNcricinfo has learnt he told his team-mates after Day 3 of the ongoing match against Zimbabwe in Harare. pic.twitter.com/Co949tDxt2
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 9, 2021
महत्त्वाची बाब म्हणजे महमुदुल्लाहने तब्बल १७ महिन्यानंतर बांग्लादेश कसोटी संघात पुनरागन केले होते. या सामन्यात त्याने २७८ चेंडुचा सामना करताना १७ चौकार आणि १ षटकारासंह नाबाद १५० धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने नवव्या गड्यासाठी १९१ धावांची भागीदारी करत संघाला संकटातुन बाहेर काढले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगें’ धोनीसोबत मीही निवृत्ती घेणार, रैनाचं मोठं वक्तव्य
- कोपा अमेरिका: २८ वर्षानंतर अर्जेटिनाने पटकावले जेतेपद; ब्राझीलचा १-० ने पराभव
- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सोमवारी औरंगाबादेत
- ‘दुबार पेरणीचे संकट; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्या’, आ.दानवेंची ठाकरे सरकारकडे मागणी
- ‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू!’, चंद्रकांत पाटील यांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
