Share

हरलीनच्या ‘त्या’ कॅचवर महिंद्रा यांची विशेष टिप्पणी, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या भारतीय महिला संघाचा टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला. पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाने ७ गडी गमावत १७७ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ८ षटके झाल्यानंतर पावसाचा व्यत्यय आला आणि अखेर डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडला १८ धावांनी विजय मिळवला.

हरलीन देओलच्या त्या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहे. यादरम्यान या व्हायरल कॅचचा व्हिडीओ प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहीले आहे की, ‘नाही. शक्यच नाही. हे होऊच शकत नाही. मला नक्की खात्री आहे यात काहीतरी स्पेशल इफ्फेक्टचा वापर करण्यात आला आहे. काय? हे खरं आहे? तर मग गाल गाडोटला मागे सोडा खरी वंडर वुमन इथे आहे.’ अशा शब्दात कौतुक केले आहे.

केवळ अनंत महिंद्रा नव्हे तर सचिन तेंडुलकर, सुरेश रैना यासारख्या अनेक दिग्गजांनी हरलिनचे कौतुक केले आहे. हरलीनने सिमारेषेच्या काही इंच दुर झेल पकडत चेंडु पुन्हा हवेत फेकला. यानंतर तिचा तोल गेला आणि ती सिमारेषेपार गेली. मात्र चेंडु पुन्हा खाली येत असताना तिने हवेत सुर मारत सुरेख झेल टिपला. अविश्वसणीय झेल घेतल्यानंतर हरलीनला सुपरवुमन म्हणले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!