Share

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात औरंगाबादेत बहुजन मुक्ती पार्टीचे ‘वाहनांना धक्का’ मारो आंदोलन!

Published On: 

औरंगाबाद : कोरोनामुळे हाताला काम नाही. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यात आता महागाई वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांनी कसे करायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेल वाढते दर कमी करावे या मागणीसाठी आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने औरंगाबाद शहरासह एकाच वेळी ३६ जिल्ह्यात धक्का मारो आंदोलन करण्यात आले.

बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने वाढती महागाईच्या विरोधात मंगळवारी (दि.१५) शहरातही जिल्हाधिकारी परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहनांना धक्का देत वाढती महागाई कमी झालीच पाहिजे. गॅस, डिझेल, पेट्रोल, खाद्यतेलासह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी झाल्याच पाहिजे. अशा घोषणा देत वाहनांना संपूर्ण परिसरात धक्का मारत आंदोलन केले.

यावेळी महागाई कमी करावी, त्यात पेट्रोल, खाद्यतेल, घरगुती गॅस चे दर कमी करावे, वीज बिल माफ करावे अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीचे बाळासाहेब मिसाळ, जिल्हाध्यक्ष नंदू खोतकर, युवा जिल्हाध्यक्ष अनिल धांडे, एल.बी.जगताप, विष्णू येडे, कडूबा पवार, बाबासाहेब मिसाळ, अलियार खान, शेख फरीद, मौलाना नेम कासनी, संतोष साळवे सह आदींच्या वतीने करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!