Share

आज राज्यात १५,१७६ रुग्णांनी केली कोरोनावर मात तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद

Published On: 

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आढळत आहे. देशभरासह राज्यातील करोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट आता हळूहळू कमी होत आहे. अनलॉक प्रक्रियेला सुरूवात होऊन निर्बंधामध्ये सूट देण्यात आलीये. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन, याबाबत निर्णय घेतले जात आहेत.

आज दैनंदिन रुग्णसंख्या ही 10 हजारांखाली आली आहे. आज राज्यात 9350 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आज राज्यात 15176 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 56,69,179 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट हा 95.69 टक्के इतका झाला आहे. ही एक निश्चितच दिलासादायक बाब महाराष्ट्रासाठी आहे.
मृतकांचा आकडा चिंता वाढवणारा

राज्यात आज एकूण 388 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे सध्या राज्यातील मृत्यू दर हा 1.93 टक्के इतका झाला आहे. मृत्यू दर हा 2 टक्क्यांच्या जवळ पोहोचल्याने चिंता वाढली आहे. आज राज्यात नोंद झालेल्या 388 मृत्युंपैकी 275 मृत्यू हे मागील 48 तासांतील आहेत तर 113 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ५७५ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ७१८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!