🕒 1 min read
लखनऊ : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात लोनी येथे मशिदीत जात असलेल्या एका मुस्लीम वृद्धाला ५ जून रोजी मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अब्दुल समद असे मारहाण झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून हल्लेखोरांनी त्यांचे ऑटोरिक्षामधून अपहरण केले आणि जवळच्या जंगलातील झोपडीत नेऊन त्यांना मारहाण केली. हल्लेखोरांनी समद यांना ‘जय श्रीराम’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा देण्याची बळजबरी करत, त्यांना हातांनी, काठीने मारहाण केली. समद हे पाकिस्तानी हेर असल्याचा आरोपही या हल्लेखोरांनी केला.
दरम्यान या प्रकरणावर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भाष्य केले. राहुल गांधी यांनी ट्वीटरवर एक बातमी शेअर करत लिहिले की, ‘मी हे मानायला तयार नाही की श्रीराम यांचे खरे भक्त असे करु शकतात, अशी क्रौर्यता माणुसकीपासून दूर आहे आणि ती समाज आणि धर्म या दोघांसाठीही लाजिरवाणी आहे.’
प्रभु श्री राम की पहली सीख है-"सत्य बोलना" जो आपने कभी जीवन में किया नहीं।
शर्म आनी चाहिए कि पुलिस द्वारा सच्चाई बताने के बाद भी आप समाज में जहर फैलाने में लगे हैं।
सत्ता के लालच में मानवता को शर्मसार कर रहे हैं। उत्तर प्रदेश की जनता को अपमानित करना, उन्हें बदनाम करना छोड़ दें। pic.twitter.com/FOn0SJLVqP
— Yogi Adityanath (@myogiadityanath) June 15, 2021
राहुल गांधी यांच्या या ट्विटला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘प्रभू श्रीरामांची पहिली शिकवण आहे – सत्य बोलणे, जे तुम्ही आयुष्यात कधीच केलं नाही. पोलिसांनी सत्य समोर आणून देखील तुम्ही समाजात विष कालवताय, तुम्हाला लाज वाटायला हवी. सत्तेच्या लालसेपायी तुम्ही मानवतेला बदनाम करत आहात. उत्तर प्रदेशच्या जनतेला बदनाम आणि अपमानित करणं थांबवा,’ असा इशाराच योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईकरांच्या सेवेत लोकल परतणार ? ; २ दिवसात निर्णय होणार
- ‘मूक मोर्चाची मूका मोर्चा म्हणून खिल्ली उडवणाऱ्यांकडून दुसरी अपेक्षाही नाही ‘
- Airtel 5G नेटवर्कची गुरुग्रामध्ये चाचणी सुरू
- ‘धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा’
- औरंगाबादेत भूमिगत गटार योजना झाली ‘भूमिगत’! मात्र नागरिकांकडून सक्तीने करवसुली सुरूच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
