🕒 1 min read
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी काल(१४ मार्च) लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच देशात २०१८ ते २०२१ या काळात प्रचंड महागाई वाढली असून गरिबांनी जगायचे कसे?, असा सवालही सुप्रिया सुळेंनी केला आहे.
यासंदर्भात सुप्रिया सुळेंनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणालाय की,‘लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान बोलताना देशांतर्गत वाढलेली महागाई आणि त्याचा सर्वसामान्य जनतेवर झालेल्या दुष्परिणामाचा मुद्दा मांडला. वाणिज्य मंत्रालयानुसार नोव्हेंबर २०२१ मध्ये ‘घाऊक किंमत निर्देशांक’ गेल्या वर्षीच्या तुलनेत १४.२३ टक्के वाढला. इंधन आणि अन्नपदार्थांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे ही स्थिती उद्धवली आहे. केंद्र सरकार गत २०२० पासून अतिशय वेगाने पेट्रोल, डिझेल आदी इंधनाच्या किंमती वाढवित आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी शंभरी ओलांडली असून स्वयंपाकाचा सिलिंडर देखील ८५० रुपयांच्या पुढे गेला आहे.’
लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान बोलताना देशांतर्गत वाढलेली महागाई आणि त्याचा सर्वसामान्य जनतेवर झालेल्या दुष्परिणामाचा मुद्दा मांडला. वाणिज्य मंत्रालयानुसार नोव्हेंबर २०२१ मध्ये 'घाऊक किंमत निर्देशांक' गेल्या वर्षीच्या तुलनेत १४.२३ टक्के वाढला. https://t.co/UzX7mub2Ls
— Supriya Sule (@supriya_sule) March 14, 2022
तसेच ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०१८ ते २०२१ दरम्यान सूर्यफुलाच्या तेलाच्या किंमती सुमारे ६५.७ टक्क्यांनी वाढल्या आहेत तर पामतेल ६१.९ टक्क्यांनी वाढले आहे. डाळींच्या किंमतीत देखील कमालीची वाढ नोंदविण्यात आली आहे. मुग डाळींच्या किंमती ४४.७ टक्क्यांनी, उडीद डाळींच्या किंमती ५४.३ टक्क्यांनी, तुर डाळीच्या किंमती ४९.८ टक्क्यांनी, मसूर डाळीच्या किंमती ३५.९ टक्क्यांनी वाढल्या आहेत. कांद्याच्या दरात देखील ३०.३ टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्र सरकार पेट्रोलवर प्रतीलीटर ३२.९० रुपयांचे तर डिझेलवर प्रतीलीटर ३१.८० रुपयांचे उत्पादन शुल्क आकारत आहे. तब्बल ६५ टक्क्यांचा कृषीसेस,रस्ता आणि पायाभूत सुविधा सेस देखील लावण्यात आली आहे. सर्वसामान्य जनता कोविडच्या काळात भरडून निघाली आहे. तरीही केंद्र सरकार दैनंदिन वापरातील पेट्रोल,स्वयंपाकाचा गॅस यांसारख्या वस्तुंवर सेस व लेव्ही आकारत आहेत. कॅगच्या अहवालात हे नमूद आहे.या सरकारला नम्र विनंती आहे की,कृपया या सेस आणि करांमध्ये तातडीने कपात करावी. जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर ठेवून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“हिंमत असेल तर हे प्रकरण CBI ला सोपवून दाखवा”, चंद्रकांत पाटलांचे आव्हान
-
“…असे बेजबाबदार विधान करून इम्रान यांनी आपल्याच विरोधातील वणव्यात तेल ओतले”, संजय राऊतांचा प्रहार
-
IND vs SL : प्रतिष्ठा , परंपरा , अनुशासन! कर्णधार रोहितने ट्रॉफी सोपवली तरुणांच्या हाती
-
Maharashtra SSC Exams 2022 : राज्यभरात दहावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
