🕒 1 min read
मुंबई – मोदी सरकारने जनतेला महागाईपासून मुक्तीचे… अच्छे दिन येणार हे स्वप्न दाखवले. देशातल्या जनतेने त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांच्या हातात देश सोपवला परंतु जीवनावश्यक वस्तूंचे दर इतके वाढवले की जनतेला जगण्यापेक्षा मरण स्वस्त वाटू लागले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात गॅस सिलेंडरचे व टू व्हिलर गाडीचे श्राद्ध घालत निषेध नोंदवण्यात आला.
देशभरात कोरोनाचे अस्मानी संकट असतानाच केंद्रसरकारच्यावतीने महागाईचे सुल्तानी संकट जनतेवर लादण्यात आले आहे.पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल अशा सगळ्याच वस्तूंचे दर वाढवून केंद्रसरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. यामुळेच अकार्यक्षम केंद्रसरकारचा, व वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले.
आज राज्यभरात गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.#मोदी_है_तो_महंगाई_है #कोरोनाने_वाचलो_अन_महागाई_ने_मेलो#बीड #उस्मानाबाद #लातूर #मावळ@NCPspeaks @Jayant_R_Patil @supriya_sule pic.twitter.com/sTOArNLWLX
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 13, 2021
यावेळी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी उपमहापौर दिलीप बराटे, महिला शहराध्यक्ष मृणालिणीई वाणी, नगरसेवक सचिन दोडके, युवक अध्यक्ष महेश हांडे, भावना पाटील, पुनम पाटील, अनिता पवार ,श्वेता होनराव व महिला पदाधिकारी उपस्थिती होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देश फक्त 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंगांच्या हाती द्या’
- अमरावतीत दोन डॉक्टरांकडून रेमडेसिवीरचा काळाबाजार, सहा जण अटकेत
- ‘कोरोना लसीसाठी पैसे नाही म्हणणारे सोशल मीडियावर 6 कोटी खर्च करत आहेत’
- ‘लसीकरण बंद करण्याबाबतचे आरोग्यमंत्र्यांचे ‘ते’ विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस’
- देशात तीनच कंपन्यांना परवानगी असताना Moderna ची लस कशी काय दिली जातेय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

