Share

Amol Mitkari | “रूपाली चाकणकर आहेत तरी कुठे?” अमोल मिटकरी प्रकरणावरुन भाजपचा सवाल

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर त्यांच्याच पक्षातील जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी गंभीर आरोप केले आहेत. अकोला राष्ट्रवादीतल्या वादाचा तिसरा अंक सुरू आहे. यादरम्यान भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

अतुल भातखळकर यांचा रुपाली चाकणकर यांना सवालः

अकोला राष्ट्रवादीतील वादाचा तिसरा अंक, अमोल मिटकरी यांचा एका महिलेच्या प्रकरणातील व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा दावा अकोला जिल्हाध्यक्षांनी केला आहे. दरम्यान स्त्री सन्मानावरून अवघ्या जगाला ज्ञानामृत पाजणाऱ्या सुप्रिया सुळे आणि रूपाली चाकणकर आहेत तरी कुठे?, असं सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटद्वारे केला आहे.

अमोल मिटकरींनी 10 लाख देऊन प्रकरण निपटवलं-

 

अमोल मिटकरी यांनी एका महिलेला तीन दिवस आकोलाच्या विश्रामगृहावर ठेवलं होतं. हे प्रकरण महिलेला 10 लाख देऊन निपटवण्यात आलं असून मिटकरी यांच्या पाया पडतानाचा व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा दावा शिवा माहोड यांनी केला आहे. तसेच ती महिला कोण होती?, असा सवाल देखील अमोल मिटकरींवर करण्यात आला आहे.

शिवा मोहोड यांनी केलेल्या आरोपांवर मिटकरींनी पलटवार केला आहे. आरोप करणाऱ्या शिवा मोहोड यांचं चरित्र आणि चारित्र्य तपासावं असा पलटवार यावेळी आमदार मिटकरींनी केला आहे. तसेच त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

दरम्यान, आपल्या चारित्र्यावर आरोप करणाऱ्या अमोल मिटकरींनी त्याचे पुरावे द्यावे अन्यथा दहा दिवसांनंतर आपल्याकडे असलेला व्हिडीओ आणि सर्व पुरावे माध्यमांसमोर उघड करणार असल्याचं शिवा मोहोड यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्याः 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!