🕒 1 min read
मुंबई : राज्यात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. राज्य आर्थिक संकटात असल्याचे सरकारकडून वारंवार सांगितले जात असून राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगितले जात आहे. एका बाजूला ही परिस्थिती असल्याचे भासवले जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी वर्षाला 6 कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला असल्याचे वृत्त समोर आले आहे.
या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यात कोरोना महामारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडला आहे.अशातच सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी यासंदर्भातील आदेश जारी केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
या आदेशात अजित पवार यांची सोशल मीडियावरील खाती सांभाळण्यासाठी आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एखादी बाहेरची कंपनी नियुक्त करण्यात येणार आहे. ही कंपनी अजित पवार यांचे ट्विटर, फेसबुक, ब्लॉगर, यूट्युब आणि इन्स्टाग्राम खात्याचे काम बघेल.
याशिवाय, व्हॉटसएप बुलेटिन, टेलिग्राम आणि एसएमएस पाठवण्याची जबाबदारीही या कंपनीवर असेल. अजित पवार यांचे सचिव आणि सामान्य माहिती व जनसंपर्क विभागाशी बोलणी झाल्यानंतर या नव्या कंपनीकडे सर्व कारभार दिला जाईल.
दरम्यान, आता या मुद्द्यावरून राजकारण तापू लागले असून कोरोना लसीसाठी पैसे नाही म्हणणारे महावसुली सरकार सोशल मीडियासाठी 6 कोटी रुपये खर्च करायला निघालं आहे, अशा शब्दात भाजप आमदार राम कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
महाराष्ट्र सरकार डेप्युटी cm @AjitPawarSpeaks जी के social media के लिये 6 cr खर्च करने जा रही है
क्या प्राथमिकता है vaccinations के लिये पैसे नहीं कहनेवाले अब पर खुद की वाह वाह के लिये करोडों खर्च करेंगे
— Ram Kadam (@ramkadam) May 13, 2021
‘कोरोना लसीसाठी पैसे नाही म्हणणारे महावसुली सरकार सोशल मीडियासाठी 6 कोटी रुपये खर्च करायला निघालं आहे. उपमुख्यमंत्र्यांसाठी 6 कोटी, तर अशा डझनभर मंत्र्यांसाठी केवढे पैसे खर्च केले जाणार आहेत. लोकांच्या घामाचा पैसा स्वतःची वाहवा करण्यासाठी वापरला जाणारा आहे. या सरकारची प्राथमिकता काय आहे?’ असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देश फक्त 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंगांच्या हाती द्या’
- अमरावतीत दोन डॉक्टरांकडून रेमडेसिवीरचा काळाबाजार, सहा जण अटकेत
- WHOने केला कोरोना विषाणूच्या B.1.617 या प्रकाराचा चिंताजनक प्रकारामध्ये समावेश
- ‘लसीकरण बंद करण्याबाबतचे आरोग्यमंत्र्यांचे ‘ते’ विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस’
- देशात तीनच कंपन्यांना परवानगी असताना Moderna ची लस कशी काय दिली जातेय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

