Share

Rupali Chakankar | “भारतमाता विधवा की सधवा ठरवणारे तुम्ही कोण?”; रुपाली चाकणकर यांचा संभाजी भिडेंना खोचक सवाल

Published On: 

Rupali Chakankar | पुणे :  शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी एक विधान केलं आहे. एका महिला पत्रकाराने त्यांच्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘आधी कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलतो,’ असं म्हणत संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महिला पत्रकाराला बोलण्यास नकार दिला. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी संभाजी भिडे यांना सुनावलं आहे.

त्या म्हणाल्या, “संभाजी भिडे मुलींना टिकली लावण्याचा आग्रह धरतात. त्यांना मला सांगायचंय की, ज्या सावित्रीमाई आडवं कुंकू लावत होत्या डोक्यावरून पदर घेत होत्या. त्यांनाही तुम्ही त्रास दिला. या सनातनी मानसिकतेला आमचा विरोध आहे आणि इथून पुढेही राहील.” जिजाऊ, लक्ष्मीबाई, अहिल्याबाई यांचं योगदान काहीच नाही का ? भारत माता सधवा का विधवा हे ठरवणारे तुम्ही कोण?, असा सवाल रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी संभाजी भिडे यांना केलाय.

ज्या सत्यवानाच्या सावित्रीला आम्ही पाहिलं नाही. तिला आम्ही मानतो आणि पुढे घेऊन जातो आणि बंधनात बांधून घेतो. पण सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा ज्योतिबांची सावित्री आम्हाला जास्त प्रिय आहे, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत. विधवांचा सन्मान करण्यासाठी आम्ही हळदीकुंकू सोहळा करतो. मुलीने टिकली लावली नाही म्हणून तिला नाकारणाऱ्या मनुवादी भूमिकेला मात्र माझा विरोध आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

संभाजी भिडेंचं वक्तव्य काय? (What is statement of Sambhaji Bhide)

बुधवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संभाजी भिडे यांच्याशी संवाद साधला. त्यात एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने संभाजी भिंडेंना प्रश्न विचारला, ‘तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली?’ यावर “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही,” असं वक्तव्य भिडे यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!