🕒 1 min read
मुंबई : देशात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रभाव आता ओसरत असून उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत काहीशी घट दिसून येत आहे. मात्र, तरीही अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवबाधितांची संख्या सातत्यानं वाढत असल्याचे चित्र आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरु आहेत. यातच आता केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका मोदी सरकावर ठेवण्यात येत आहे. सोशल मीडियातूनही मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारवर टीका होत आहे. काँग्रेस नेते आणि मुंबईतील काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ता असलेल्या दत्तू गवाणकर यांनी ट्विट करुन केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.
‘देश फक्त 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंग यांच्या हाती द्या, मग बघा कशी सर्व स्थिती नियंत्रणात येईल, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. सुशिक्षित आणि अनपढ यांच्यातील फरक लक्षात येईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
देश फक्त सहा महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ मनमोहन सिंग यांच्या हाती द्या…
बघा सर्व स्थिती कशी नियंत्रणात येईल..!!
"सुशिक्षित आणि अनपढ़ याच्या मधला फरक सुद्धा लक्षात येईल"
— ???????????????????? ???????????????????????????????? दत्तू गवाणकर (@GavankarDattu) May 12, 2021
दरम्यान,दुसऱ्या बाजूला कोविड 19 विरोधी लढा देण्यासाठी उपाययोजना सुचवणारं पत्र 12 विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. कोविड प्रतिबंधक लसी मिळवण्यासाठी सर्व उपलब्ध स्त्रोतांचा उपयोग करून देशव्यापी मोफत लसीकरण ताबडतोब सुरु करण्याची मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.
सर्व बेकारांना दर महिन्याला किमान सहा हजार रुपये भत्ता देण्याची मागणी करण्यात आली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे शरद पवार, सीपीआयएम चे सचिव सीताराम येचुरी, तृणमूल कॉंग्रेस प्रनुख ममता बॅनर्जी आदींनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! सीएसकेचा ‘हा’ प्रशिक्षक पुन्हा कोरोनाबाधीत
- ६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीलाही आता मिळणार प्राधान्य
- WHOने केला कोरोना विषाणूच्या B.1.617 या प्रकाराचा चिंताजनक प्रकारामध्ये समावेश
- ‘लसीकरण बंद करण्याबाबतचे आरोग्यमंत्र्यांचे ‘ते’ विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस’
- ‘पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी जे नियोजन करायला हवे होते ते केले नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
