Share

Rupali Chakankar | जगाला ज्ञानामृत पाजणाऱ्या रूपाली चाकणकर कुठे आहेत? ; मिटकरी प्रकरणावर भाजप आक्रमक!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर त्यांच्याच पक्षातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी गंभीर आरोप केले आहेत. अमोल मिटकरी कमिशन घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच एका महिलेच्या संबंधित देखील आरोप अमोल मिटकरी यांच्यावर करण्यात आले आहेत. त्यामुळे अकोला राष्ट्रवादीतल्या वादाचा तिसरा अंक सुरू आहे. यादरम्यान भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून रूपाली चाकणकर नेहमीच आक्रमक –

महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून रूपाली चाकणकर नेहमीच आक्रमक राहिल्या आहेत. राज्य महिला आयोगाच्या त्या अध्यक्षा आहेत.  मात्र त्यांच्याच पक्षातील अमोल मिटकरी यांच्या महिला व्हिडीओ प्रकरणावरुन भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. या प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

अमोल मिटकरी व्हिडीओ प्रकरण-

अमोल मिटकरी यांचा एका महिलेच्या प्रकरणातील व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा दावा अकोला जिल्हाध्यक्षांनी केला आहे. अमोल मिटकरी यांनी एका महिलेला तीन दिवस आकोल्याच्या विश्रामगृहावर ठेवलं होतं. हे प्रकरण महिलेला 10 लाख देऊन निपटवण्यात आलं असून मिटकरी यांच्या पाया पडतानाचा व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा दावा शिवा माहोड यांनी केला आहे. त्यामुळे अमोल मिटकरी यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.

अतुल भातखळकर यांची टीका-

“अकोला राष्ट्रवादीतील वादाचा तिसरा अंक, मिटकरींचे एका महिलेच्या प्रकरणातील व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा जिल्हाध्यक्षांनी केला आहे. स्त्री सन्मानावरून अवघ्या जगाला ज्ञानामृत पाजणाऱ्या सुप्रिया सुळे आणि रूपाली चाकणकर आहेत तरी कुठे?”, असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!