Share

महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जनतेने नाकारले – दरेकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. भाजपच्या समाधान आवताडे यांनी मोठी आघाडी घेतली असून राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा पराभव निश्चित झाला आहे. ३७१६ मतांच्या आघाडीने समाधान आवताडे यांचा विजय झाला आहे. यामुळे भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे.

‘देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात पंढरपुरात विठू माऊलींनी आणि जनतेने समाधान आवताडे जी यांना आशीर्वाद दिले. हा भाजपच्या विकासात्मक विचारांचा विजय असून,सहानुभूतीची लाट तसेच आघाडीतील तिन्ही पक्षाच्या एकत्रित उमेदवाराला पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जनतेने नाकारले. पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जनतेचे आणि समाधान आवताडे जी यांचे हार्दिक अभिनंदन!! पंढरपूर व मंगळवेढ्यातील जनतेच्या सेवेचे घेतलेले व्रत अखंड सुरू रहावे, यासाठी शुभेच्छा!’ अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

भारतनानांच्या निधनामुळे त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्यामागे सहानुभूती असल्याने त्याचा त्यांना मोठा फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जात असली तरी समाधान आवताडे यांनी मात्र मोठी आघाडी मिळवली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काँग्रेस आणि शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी भालकेंच्या प्रचारासाठी जोर लावला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!