🕒 1 min read
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्त्वाखाली तृणमूल काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पण अनेकांना माहिती नसेल की यामागे एक आणखी एका मोठ्या व्यक्तीचा हात आहे. राजकारणातले चाणक्य म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी यंदाच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार म्हणून काम केले. पण बंगालच्या निकालानंतर प्रशांत किशोर यांनी मोठी घोषणा केली आहे. प्रशांत यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून आपण निवृत्ती घेत असल्याचे सांगितले आहे.
निकालापूर्वी प्रशांत किशोर यांनी भारतीय जनता पक्ष तीन अंकी संख्या म्हणजे शंभर जागांच्या पुढे जाऊच शकत नाही असा दावा केला होता. आपला दावा खोटा ठरल्यास आपण राजकीय संन्यास घेऊ असे ते म्हणाले होते. पण त्यांचा दावा खरा निघाल्यानंतरही त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे.
यावर ते म्हणाले की, आपल्याला संन्यास घ्यायचा होता, त्यासाठी योग्य संधीची वाट पाहत होतो. पश्चिम बंगालच्या निमित्ताने ही संधी मिळाली. मला बाहेर पडायचं आहे. राजकीय रणनीतीकार म्हणून काम करण्याची माझी इच्छा नाही’ असे प्रशांत किशोर यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. प्रशांत किशोर यांनी इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीमधून आपण बाहेर पडत असल्याचं स्पष्ट केले. त्यांनीच याची सुरुवात केली होती. तिथे अनेक हुशार लोक असून ते योगदाने देतील, पण मी संन्यास घेत आहे असे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संज्या, तू स्वतः कधी निवडून येणार ते सांग?’, निलेश राणेंनी राऊतांना डिवचले
- बंगालचे निकाल समोर येताच अमित शाहांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
- ‘जखमी वाघिणीचा ऐतिहासिक विजय!’, संजय राऊतांची बंगाल निकालावर प्रतिक्रिया
- ‘लोकांनी भाजपच्या गद्दारीला चपराक दिली’, बंगाल निकालावर गुलाबराव पाटलांची टीका
- ‘मोदी-शाह हे मोठे नेते, पण अजिंक्य नाहीत’, भाजपच्या पराभवावर राऊतांचा टोला

