Share

‘लोकांनी भाजपच्या गद्दारीला चपराक दिली’, बंगाल निकालावर गुलाबराव पाटलांची टीका

Published On: 

जळगाव : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास पूर्णपणे स्पष्ट झाले आहेत. सत्तेचा दावा करणाऱ्या भाजपला पराभूत करत ममता बॅनर्जींनी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची सत्ता मिळवल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं ममता दीदींवर पुन्हा अभिनंदनाचा वर्षाव होतोय तर भाजपवर टीका होतेय.

शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून मोदींचा करिष्मा ओसरला का? यापेक्षा राज्याचा विकास कोण करू शकतो, मातीशी कोण जुळला आहे, याचा विचार मतदारांनी केला. मोदींकडे जे लोक गेले होते, ते ममता दीदींचेच अपत्य होते. त्यामुळे लोकांनी ‘लाश वही है, बस कफन बदल गया है’, अशा प्रकारची हुशारी दाखवली. लोकांनी भाजपच्या गद्दारीला चपराक दिली आहे’, असे त्यांनी सांगितले.

भाजपला थेट केंद्रातून सर्व प्रकारची रसद पुरवली गेली. पण त्यांच्याकडे राज्याचे नेतृत्त्व करणारा चेहरा नसल्यानेच ममता दीदींच्या बाजूने जनमताचा कौल गेला असे मला वाटते. कोणत्याही राज्याचा नागरिक केंद्राच्या वेळी वेगळ्या पद्धतीने मतदान करतो. राज्याच्या वेळी तो वेगळ्या पद्धतीने करतो. ममता दीदींनी राज्याचे नेतृत्त्व करावे, हे पश्चिम बंगालमधील लोकांच्या मनात पक्के होते. हे सिद्ध झाले आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!