मुंबई : भाजप नेत्यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीपूर्वी जोरदार शक्तीप्रदर्शन केले असल्याचे चित्र पाहायला मिळाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केले होते. यावेळी शहा यांनी जनतेला संबोधित करताना, निवडणुकीपूर्वी २०० चा आकडा पार करण्याचा विश्वास व्यक्त केला होता.
निवडणूक प्रचारादरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपला २०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असं वक्तव्य केलं होतं. पण, सध्याच्या कलानुसार भाजप ७७ जागांवर आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर तृणमूलचे नेते डेरेन ऑबेरायन यांनी अमित शहांचा एक व्हिडिओ शेअर करत खिल्ली उडवली आहे. यावेळी त्यांनी कोणतंही भाष्य न करता फक्त स्माईली टाकली आहे.
???????? pic.twitter.com/HgLVbq5Lni
— Derek O'Brien | ডেরেক ও'ব্রায়েন (@derekobrienmp) May 2, 2021
पश्चिम बंगालच्या मतमोजणीच्या कलांवरून त्या राज्यात ममता बॅनर्जींची लाट कायम असल्याचं स्पष्ट झालंय. तृणमूलने दोनशेंच्या वर जागांवर आघाडी घेतली असून बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता राज येण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये २०० च्या वर जागा जिंकू असा दावा करणाऱ्या भाजपला त्याच्या अर्ध्याहून कमी जागांवर आघाडी मिळाली आहे. देशात कोरोनाने हाहाकार माजवला असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अनेक बड्या नेत्यांना पश्चिम बंगालच्या निवडणुकीत जास्त रस असल्याचं दिसून आलं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जखमी वाघिणीचा ऐतिहासिक विजय!’, संजय राऊतांची बंगाल निकालावर प्रतिक्रिया
- ‘लोकांनी भाजपच्या गद्दारीला चपराक दिली’, बंगाल निकालावर गुलाबराव पाटलांची टीका
- ‘मोदी-शाह हे मोठे नेते, पण अजिंक्य नाहीत’, भाजपच्या पराभवावर राऊतांचा टोला
- ‘संपूर्ण ताकद पणाला लावली पण पदरी निराशाच आली’, खडसेंचा भाजपला टोला
- रेमडेसिवीर प्रकरण; खा.सुजय विखेंच्या अडचणीत वाढ, ‘या’ अधिकाऱ्याकडे दिला तपास


