मुंबई : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार हे निश्चित आहे. ममतांना पराभूत करण्यासाठी या निवडणुकीत भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. हे आव्हान स्विकारत ममता बॅनर्जी भाजपसमोर ठामपणे उभ्या राहिल्या होत्या.
यंदाही ममता बॅनर्जी यांनी हॅटट्रिक करत विजय मिळवला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे मोठे नेते आहे, पण अजिंक्य नाही. हे आज बंगालच्या जनतेनं दाखवून दिले,’ अशी टीका शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी केली.
‘बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला फक्त बहुमत मिळाले नाही, तर प्रचंड बहुमत मिळालं आहे. ममता बॅनर्जी यांना १२५ जागा सुद्धा मिळणार नाही, निकालानंतर ममता घरी जातील असं वातावरण निर्माण करण्यात आले. पण ममतांनी आपण कोण आहोत, हे दाखवून दिलं आहे. जिद्द काय असते हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे’ या शब्दांत राऊत यांनी कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे मोठे नेते आहेत. निवडणूक जिंकण्याचे तंत्र त्यांच्याकडे आहे. सत्ता आहे. पण ते अजिंक्य नाही, हे आज पश्चिम बंगालच्या निवडणुकीतून दिसून आलं आहे’ असा टोलाही राऊत यांनी लगावला. दरम्यान, भाजपच्या संख्या नक्की वाढली आहे. लोकसभेतही जागा वाढेल. त्यांची मेहनत आहे, इन्वसेमेन्ट सुद्धा जास्त आहे. कुणाच्या पक्षाच्या जागा वाढत जरी असल्या तरी कोरोनाची संख्या महत्त्वाची आहे. कोरोनाची आकडेवारी कमी झाली पाहिजे, असाही टोलाही राऊत यांनी आज सकाळी लगावला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संपूर्ण ताकद पणाला लावली पण पदरी निराशाच आली’, खडसेंचा भाजपला टोला
- पुरोगामी महाराष्ट्र हादरला! पतीला घटस्फोट देणाऱ्या महिलेला जातपंचायतीकडून थुंकी चाटण्याची शिक्षा
- रेमडेसिवीर प्रकरण; खा.सुजय विखेंच्या अडचणीत वाढ, ‘या’ अधिकाऱ्याकडे दिला तपास
- ‘..तर अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील’, उत्तर कोरियाचा इशारा
- बायकोला भेटण्यासाठी चोर कोविड सेंटरमधून पळाला, पण बायकोनेच त्याला पकडून दिले


