मुंबई : पश्चिम बंगालच्या मतमोजणीच्या कलांवरून त्या राज्यात ममता बॅनर्जींची लाट कायम असल्याचं स्पष्ट झालंय. तृणमूलने दोनशेंच्या वर जागांवर आघाडी घेतली असून बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता राज येण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये २०० च्या वर जागा जिंकू असा दावा करणाऱ्या भाजपला त्याच्या अर्ध्याहून कमी जागांवर आघाडी मिळाली आहे. देशात कोरोनाने हाहाकार माजवला असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अनेक बड्या नेत्यांना पश्चिम बंगालच्या निवडणुकीत जास्त रस असल्याचं दिसून आलं.
दरम्यान, ममतांच्या या विजयानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी खास आपल्या त्यांचे अभिनंदन केलं आहे. ते म्हणाले, ‘बंगालच्या वाघिणीचे अभिनंदन करतो. तेथील जनतेने दबावात न येता मतदान करून प्रतिष्ठा कायम राखली. एक स्त्री, जखमी वाघीण एकटी लढली, केंद्राच्या एजन्सीचा दबाव असूनही त्या मागे हटल्या नाहीत. हा एक ऐतिहासिक विजय आहे. ममतांच्या विजयाने देशातील विरोधकांना ऊर्जा मिळालीय. पुढील दिशा स्पष्ट करण्यासाठी ही ऊर्जा उपयोगी पडेल’.
Congratulations Tigress of Bengal..
ओ दीदी,
दीदी ओ दीदी!
@MamataOfficial @derekobrienmp @MahuaMoitra pic.twitter.com/orDkTAuPr3— Sanjay Raut (@rautsanjay61) May 2, 2021
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे मोठे नेते आहे, पण अजिंक्य नाही. हे आज बंगालच्या जनतेनं दाखवून दिले,’ अशी टीका शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी केली. ‘बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला फक्त बहुमत मिळाले नाही, तर प्रचंड बहुमत मिळालं आहे. ममता बॅनर्जी यांना १२५ जागा सुद्धा मिळणार नाही, निकालानंतर ममता घरी जातील असं वातावरण निर्माण करण्यात आले. पण ममतांनी आपण कोण आहोत, हे दाखवून दिलं आहे. जिद्द काय असते हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे’ या शब्दांत राऊत यांनी कौतुक केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लोकांनी भाजपच्या गद्दारीला चपराक दिली’, बंगाल निकालावर गुलाबराव पाटलांची टीका
- ‘मोदी-शाह हे मोठे नेते, पण अजिंक्य नाहीत’, भाजपच्या पराभवावर राऊतांचा टोला
- ‘संपूर्ण ताकद पणाला लावली पण पदरी निराशाच आली’, खडसेंचा भाजपला टोला
- रेमडेसिवीर प्रकरण; खा.सुजय विखेंच्या अडचणीत वाढ, ‘या’ अधिकाऱ्याकडे दिला तपास
- ‘..तर अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील’, उत्तर कोरियाचा इशारा


