मुंबई : संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असताना महाराष्ट्रात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली होती. एका युवतीच्या गुप्तांगातून कोरोना चाचणी करण्याचा अश्लाघ्य प्रकार अमरावती येथील बडनेरा येथे घडला होता. मात्र, या गंभीर प्रकरणाची अद्यापही सरकारकडून दखल घेण्यात आलेली नाही. ती पिडीत न्यायापासून वंचित आहे. पिडीतेला न्याय मिळावा याकरिता विरोधक आक्रमक झाले होते. यात भाजप नेत्या चित्रा वाघ आघाडीवर होत्या.
दरम्यान, पीडितेला न्याय मिळण्याकरिता प्रयत्न करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चालवलेल्या मुस्काटदाबीचा प्रत्यय आला आहे.
‘कोरोना काळात गुप्तांगातून स्वॅब घेण्याचा गलिच्छ प्रकार अमरावतीत घडला. मुख्यमंत्री गृहमंत्री तिथं फिरकलेही नाहीत. नैतिक जबाबदारी समजत तरूणीची विचारपूस व प्रशासनाला जाब विचारला, तर माझ्यावरचं गुन्हा दाखल केला. जेवढा त्रास द्याल तेव्हढीच उफाळून उठेन हे लक्षात ठेवा’, अशा आशयाचे ट्वीट करून चित्रा वाघ यांनी दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती देत सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
कोरोना काळात बडनेरा येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. मात्र, अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पीडितेला भेटण्याचे सौजन्यही दाखवले नव्हते. चित्रा वाघ यांनी घटनास्थळी जावून पीडितेला न्याय मिळावा म्हणून आवाज उठवला होता. पण पीडितेला धीर देणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावरच गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अखेर शेतकरी आंदोलनावर समलमान खानने सोडले मौन, म्हणाला…
- मध्यम वर्गीयांचा अपेक्षाभंग; आरबीआयकडून पतधोरण जाहीर !
- प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होत असलेल्या नाना पटोले यांना ‘या’ आव्हानांचा करावा लागू शकतो सामना
- पुण्यामध्ये पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर! 93 रुपये प्रति लीटरने होतेय विक्री
- ‘शेतकरी आंदोलनात माझ्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
