Share

अखेर शेतकरी आंदोलनावर सलमान खानने सोडले मौन, म्हणाला…

Published On: 

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. पॉप सिंगर रिहानाने समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला.

हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही याबाबत सरकारला पाठिंबा दिला आहे. सचिन तेंडुलकरच्या ट्वीटनंतर भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी यावर ट्वीट केले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, शिखर धवन यांनी ट्वीट केले आहे. क्रिकेपटूंनी ट्वीट केल्यानंतर #IndiaTogether हा हॅशटॅग ट्रेंड झाला.

त्यानंतर, विराट कोहली, रोहित शर्मा, अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी यांनीही ट्विट करुन हा Propaganda भारतविरोधी असल्याची भूमिका घेतली. शेतकरी आंदोलनावरुन सुरु झालेल्या ट्विटर वॉरवर आता इतरही सेलिब्रिटी मैदानात उतरुन आपलं मत मांडत आहेत.  मात्र, काही सेलिब्रिटींची अद्यापही कीप सायलंट अशीच भूमिका आहे. पण, एका कार्यक्रमादरम्यान, पत्रकारांनी सलमान खानला बोलतं केलं.

गुरुवारी सलमान खान मुंबईतील एका म्युझिक शोच्या लाँचिंगसाठी आला होता, त्यावेळी मीडियाशी संवाद साधताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात सलमानला प्रश्न विचारण्यात आला. देशातील शेतकरी आंदोलनावर अनेक सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्संने आपलं मत व्यक्त केलंय. त्यावर, आपली काय भूमिका? असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला होता.

त्यावेळी, सलमानने बचावात्कम पवित्रा घेत समतोल उत्तर दिलंय. नक्कीच मी यासंदर्भात भाष्य करेल, जे योग्य आहे ते व्हायलाच हवं, उचित व्हायलाच हवं, बरोबर ते बरोबर व्हावे, सर्वांसाठी ! असे उत्तर सलमान खानने मीडियाशी बोलताना दिले. त्यामुळे, सलमानने दिलेल्या उत्तराचा नेमका अर्थ काढायचं काय, असा प्रश्न अनेकांना पडलाय. सलमानने ना थेट शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले, ना विरोध. त्यामुळे, सलमान बोल कर भी कुछ नही बोला… असंच म्हणावं लागेल. दरम्यान, अद्याप बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान आणि मिस्टर परफेशनिस्ट आमीर खानने यासंदर्भात ट्विट किंवा भाष्य केलं नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!