मुंबई : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सादर केल्यानंतर आता त्यांचीच वर्णी प्रदेशाध्यक्षपदी लागणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.औपचारिक घोषणा करण्यात आली नसली तरीही राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये नाना पटोले यांचेच नाव आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात कॉंग्रेस अधिक बळकट करण्यासाठी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षासोबत महाराष्ट्रात आणखी काही संघटनात्मक बदल केले जाणार आहेत अशी माहिती समोर येत आहे. राज्यातील काँग्रेसचे कार्याध्यक्ष बदलण्यासाठी हायकमांड आग्रही असल्याचे कळते.
संघटनात्मक बदल करताना मंत्र्यांऐवजी पूर्णवेळ पक्षासाठी काम करणाऱ्यांना संधी देण्याकडे काँग्रेस पक्षश्रेष्ठीचा कल असल्याचे समजते. आता प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यावर पुढे पक्ष वाढीसाठी पटोले आणि कॉंग्रेस श्रेष्ठी काही नव्या चेहऱ्यांना संधी देतील अशी शक्यता आहे.
सद्यस्थिती पाहता नैराश्येच्या गर्तेत सापडलेल्या कॉंग्रेसला नवसंजीवनी देण्याची ताकत पटोले यांच्यात आहे. विदर्भाचे प्रतिनिधित्व करणारे पटोले हे अतिशय आक्रमक स्वभावाचे नेते आहेत.ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक असतात.शेतकऱ्यांच्या समस्यांची नेमकी जाण त्यांना आहे.उत्तम वक्तृत्व,सुसंस्कृतपणा,राजकीय अनुभव याशिवाय सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे चांगले संबंध या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
पटोले हे भाजपमध्ये असताना त्यांना ज्या पद्धतीची वागणूक मिळाली ते नानांच्या चांगलेच लक्षात आहे.याशिवाय मित्रपक्षांशी सुसंवाद ठेवत जास्तीत जास्त फायदा कॉंग्रेसच्या पदरात पडून घेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.विदर्भातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात कॉंग्रेसला सुगीचे दिवस आणण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. याशिवाय कोणत्याही परिस्थितीत भाजपला रोखण्यासाठी नाना सर्वतोपरी प्रयत्न करणार याबद्दल कोणतीही शंका नाही. जुन्या आणि नव्या नेत्यांचा ताळमेळ घालत राज्यात पुन्हा कॉंग्रेसला क्रमांक एकचा पक्ष करणे हे त्यांचे लक्ष्य असेल.
आक्रमक अश्या भाई जगताप यांच्यावर मुंबईची जबाबदारी पक्षाने सोपवत कॉंग्रेसने आपले मनसुबे याआधीच स्पष्ट केले असताना जगताप यांच्याप्रमाणे मातीशी नाते असेलेला एक आक्रमक चेहरा आता प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्याचा कॉंग्रेसला निश्चितच फायदा होईल.
महत्वाच्या बातम्या
- ‘हा देखील नेहमीप्रमाणे ‘शब्दाचा बुडबुडा’च ठरला’ सामनातुन केंद्र सरकारवर टीका !
- नाणेफेक जिंकून इंग्लंडचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
- टीम इंडियाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनाची चर्चा, विराट कोहलीने दिली माहिती
- टिकून राहायचे असेल तर भारताच्या ‘या’ फलंदाजाला लवकर बाद करणे आवश्यक : रूट
- मराठा आरक्षणासाठी महत्त्वपूर्ण दिवस; आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

