नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. पॉप सिंगर रिहानाने समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र यामुळे देशाचा अंतर्गत विषय जागतिक पातळीवर गेल्याने देशाची बदनामी होत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान शेतकरी आंदोलन आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन गेल्याचा आरोप काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्यावर करण्यात आले आहेत. यावर स्पष्टीकरण देताना वड्रा यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. हे आरोप चुकीचे असल्याचं त्यांनी म्हटलं.
‘पुन्हा एकदा माझ्यावर निराधार आरोप लावण्यात येत आहेत. शेतकरी आंदोलनादरम्यान आंतरराष्ट्रीय ट्विट साठी मला जबाबदार ठरवण्यात येत आहे. तर प्रत्येक वेळी सरकार स्वतःच्या च कामगिरीने घेरले जाते आणि मुद्यावरून लक्ष वाढवण्यासाठी माझ्यावर निशाणा साधला जातो’ असा आरोप त्यांनी केला आहे. ‘मात्र, आता आपल्या देशातील लोकांना समजते त्यामुळे ते या विरूद्ध एकजूट दाखवतील’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
- अखेर शेतकरी आंदोलनावर समलमान खानने सोडले मौन, म्हणाला…
- मध्यम वर्गीयांचा अपेक्षाभंग; आरबीआयकडून पतधोरण जाहीर !
- प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होत असलेल्या नाना पटोले यांना ‘या’ आव्हानांचा करावा लागू शकतो सामना
- पुण्यामध्ये पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर! 93 रुपये प्रति लीटरने होतेय विक्री
- “श्रीमंताच्या घरातील कावळा देखील मोर दिसतो आणि गरीबाच्या घरातील मुलं तुम्हाला चोर दिसतात का?”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

