🕒 1 min read
पुणे : केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लावण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे पेट्रोलवर अडीच तर डिझेल चार रुपयांनी महागणार आहे.
इंधनावरील अबकारी करात सातत्याने वाढत आहे. त्यामुळे इंधन स्वत होईल हि अपेक्षा फोल ठरत आहे. अबकारी कराबाबत दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचे दरवाढीमुळे जनता त्रस्त आहे. यावरून विरोधक सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत.
मुंबईमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोलचे दर नव्वदीपार आहेत. आता पुण्यामध्ये देखील पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर आहेत. पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 93.14 रुपये प्रति लीटर आहेत. यूपीए सरकारच्या काळात 2013 मध्ये हे दर 93 रुपये प्रति लीटरवर पोहोचले होते. त्यांनतर आज रेकॉर्ड स्तरावर पेट्रोलचे दर पोहोचले आहेत. पेट्रोलचे भाव एवढ्या स्तरावर पोहोचल्याने त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर देखील उतरले होते.
ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात पुढीलप्रमाणे आहेत इंधनाचे दर
पेट्रोल- 93.14 रुपये प्रति लीटर
डिझेल- 82.38 रुपये
सीएनजी- 55.50 रुपये
महत्वाच्या बातम्या
- ‘हा देखील नेहमीप्रमाणे ‘शब्दाचा बुडबुडा’च ठरला’ सामनातुन केंद्र सरकारवर टीका !
- नाणेफेक जिंकून इंग्लंडचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
- टीम इंडियाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनाची चर्चा, विराट कोहलीने दिली माहिती
- टिकून राहायचे असेल तर भारताच्या ‘या’ फलंदाजाला लवकर बाद करणे आवश्यक : रूट
- “श्रीमंताच्या घरातील कावळा देखील मोर दिसतो आणि गरीबाच्या घरातील मुलं तुम्हाला चोर दिसतात का?”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
