Share

राणा दाम्पत्याच्या घराबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी ६ शिवसैनिकांना अटक!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याच्या मुंबईतील खार परिसरातील घराबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या ६ कार्यकर्त्यांना अटक केली असल्याची माहिती आहे. यासंदर्भातील माहिती पोलिसांनी दिली असून इतर कार्यकर्त्यांचा शोध सुरू आहे असेही पोलिसांनी सांगितले आहे.

राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान ठाकरेंना दिले होते. त्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याचं खार येथील निवासस्थान गाठले होते आणि त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली. शिवसैनिकांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून राणा दाम्पत्य राहत असलेल्या असलेल्या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला होता. तसंच दिवसभर शिवसैनिकांनी या परिसरात गोंधळ घालून राणा दाम्पत्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी या प्रकरणात राणा दाम्पत्याच्या घराबाहेर गोंधळ घालण्याच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद करून अटक केली आहे. तसंच इतरांचा शोध सुरू असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

राणा दाम्पत्याच्या अटकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया –

राणा दाम्पत्याला आज वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयानं दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राणा दाम्पत्य आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली. “तुम्ही ‘मातोश्री’ वर हल्ला करण्याचे नियोजन करता मग आम्ही काय बघत बसायचं का? हल्ला करण्याचं नियोजन करता आले नाही, शिवसैनिकांनी डाव हाणून पाडला ती गोष्ट वेगळी. पण अशा प्रकारचे धंदे तुम्ही करणार असाल तर शिवसैनिक शांत बसणार नाही. तसेच प्रत्येक शिवसैनिक बर्हिजी नाईक आहे. त्यामुळे मातोश्रीवर घुसणं इतकं काही सोपं काम नाही”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!