मुंबई : आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर पोलिसांकडून लावण्यात आलेले राजद्रोहाचे कलम योग्यच असल्याचे वक्तव्य केले आहे. राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हा न्यायालयाचा निर्णय आहे, सरकारचा नव्हे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, प्रत्येक कारवाई ही कायद्यानेच होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आज वांद्रे कोर्टात राणा दाम्पत्याला हजर करण्यात आले. दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधत राणा दाम्पत्य आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली. “आता माकडांचे खेळ खूप झाले. शिवसेना अॅक्शन मोडमध्ये आली आहे, असा इशाराच यावेळी दिला.
“तुम्ही ‘मातोश्री’ वर हल्ला करण्याचे नियोजन करता मग आम्ही काय बघत बसायचं का? हल्ला करण्याचं नियोजन करता आले नाही, शिवसैनिकांनी डाव हाणून पाडला ती गोष्ट वेगळी. पण अशा प्रकारचे धंदे तुम्ही करणार असाल तर शिवसैनिक शांत बसणार नाही. प्रत्येक शिवसैनिक बर्हिजी नाईक आहे. त्यामुळे मातोश्रीवर घुसणं इतकं काही सोपं काम नाही”, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –

