Share

“…आता आम्हीही घुसू”; संजय राऊतांनी दिला इशारा

Published On: 

मुंबई : आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर पोलिसांकडून लावण्यात आलेले राजद्रोहाचे कलम योग्यच असल्याचे वक्तव्य केले आहे. राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हा न्यायालयाचा निर्णय आहे, सरकारचा नव्हे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, प्रत्येक कारवाई ही कायद्यानेच होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

“हनुमान चालिसाला महाराष्ट्रात विरोध आहे का? देशात कुठेच विरोध नाहीये. हनुमान चालिसाला कोणी विरोध केला? काल ते जेलमध्ये होते, तिथे वाचू शकतात. आता त्यांना कुठल्यातरी जेलमध्ये पाठवलंय. तिथे त्यांनी हनुमान चालिसा वाचावी”, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे. तसेच “महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक हिंदुंच्या कार्यक्रमाला कोणीच विरोध केलेला नाही. पण तुमचा जो हट्ट आहे, मी मातोश्रीत घुसून वाचेल, तुम्ही घुसून वाचणार मग आता आम्हीही घुसू, असं म्हणत तुमच्या बापाचं राज्य आहे का?” असा सवालही संजय राऊत यांनी केला.

“भाजप दंगलसदृश परिस्थिती निर्माण करत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. सदावर्ते प्रकरणातही हेच झाले. त्यावेळी शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला. आता मातोश्रीवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. या सगळ्यामागे मोठे कारस्थान, षडयंत्र आहे. धर्माच्या नावाखाली राज्य उलथवण्याचा प्रयत्न झाल्यास राजद्रोहाचा खटला दाखल व्हायला हवा. भीमा-कोरेगाव प्रकरणातही भाजपने अनेक कवी आणि लेखकांविरोधात राजद्रोहाचे कलम वापरले. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आता आम्हाला शहाणपण शिकवू नये”. असे संजय राऊत यांनी स्पष्ट म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!