Share

पारधी समाजाच्या २२ वर्षीय तरुणाचा भाजपला धक्का; यवतमाळ नगरपंचयातीवर फडकला भगवा

Published On: 

यवतमाळ: राज्यभरात १०६ मतदारसंघाच्या निवडणुका (Elections) पार पडल्या. आता मतमोजणी झाली असून निकाल जाहीर करण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यभरात चांगलेच उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. सगळ्याच पक्षांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. महाविकास आघाडी असली तरी अनेक मतदारसंघांमध्ये आघाडीतील पक्ष आपापल्या बळावर लढले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात भाजपची (BJP) सत्ता आहे. विधानसभेची पाच, तर विधानपरिषदेचा एक आमदार आहे. तरीही आपल्या मतदारसंघातील नगरपंचायती आमदारांना राखता आल्या नाहीत. जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसने (Congress) मात्र चांगली मुसंडी मारली आहे. १०२ जागांपैकी ३९ जागांवर काँग्रेसने विजय मिळविला. सत्ताधारी भाजपला फक्त तेरा जागांवर समाधान मानावे लागले. तर शिवसेना (Shivsena) दुसऱ्या क्रमांकाच्या म्हणजे २५ जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे.

शिवसेना आणि कॉंग्रेस सोबतच १३ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी उमेदवार ४ जागांवर तर मनसे ३ जागांवर निवडूण आले. यवतमाळ जिल्ह्यात सर्वात कमी वयाचा २२ वर्षीय तरुण नगरपंचायत निवडणुकीत जिंकून आला आहे. त्यामुळे भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. पारधी समाजाच्या या तरुणाला शिवसेनेने संधी दिली होती. विजय चव्हाण कळंब (Vijay Chavan Kalamb) असं या युवकाचं नाव आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!