मुंबई : ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) मालिकेतील अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी राजकीय भूमिका घेतल्यानं मालिकेतून काढल्याचा आरोप केला. यानंतर त्यांच्यावर महिलांशी गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा आरोप झाला. यानंतर सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा झाल्या, नुकतच किरण माने यांनी एक फेसबुक पोस्ट (Facebook post) शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सविता मालपेकर (Savita Malpekar) यांना उत्तर दिले आहे.
दरम्यान, किरण माने यांच्यासोबत काम केलेल्या अनेक महिला सहकलाकारांनी समोर येत भूमिका मांडली. माऊच्या आजीची म्हणजे विलास पाटील यांच्या आईची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही याबाबत सडेतोड भूमिका मांडली होती. आता किरण माने यांनी फेसबुकवर सविता यांच्यासोबत फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. “मी लाडानं तुला ‘म्हातारे’ अशी हाक मारायचो… अगदी परवा-परवा शेवटच्या दिसापर्यन्त ! तू बी माझ्याशी लै प्रेमानं वागत हुतीस.. आपल्या शुटिंगच्या शेवटच्या दिसापर्यन्त !! अलीकडच्या दिवसांत कुनीतरी तुझे माझ्याबद्दल गैरसमज करून दिलेवते… “किरण लेखकांना सांगून तुझा पत्ता कट करतोय.” असं तुला वाटायला लागलं… तसेच आपण हसलो… आणि मग पुन्हा आपलं “म्हातारेS-इलासाS ” सुरू झालं…”, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
पुढे ते पोस्टमध्ये म्हणाले, ‘परवा तुला टीव्हीवर तावातावाने माझ्या इरोधात बोलताना मला धक्काच बसला ! वाईट वाटलं.. काळजात आत कायतरी लै तुटल्यागत झालं…पन म्हातारे, तुझ्यावर राग नाही धरणार.. तुझीबी कायतरी मजबूरी आसंल गं… कुनाच्या पोटावर पाय येत असताना कुनी आसं बोलंल व्हय? असे म्हणत पुढे म्हणाला पूर्वी आणून देत होतो, तश्शीच.. तेवढ्याच मायेनं! तुझ्यावर राग नाय गं माझा.’

काय म्हणाल्या होत्या सविता मालपेकर?
माझ्याबरोबर त्याने असे काहीही केलेले नाही. बाकीच्या सहकलाकारांना सतत टोमणे मारणे, माझ्यामुळे सिरिअल सुरु आहे. मी हिरो आहे सिरीअलचा, मी हिला काढेन, मी त्याला काढेन ही भाषा कशासाठी. तू जरी हिरो असला तरी ते सिद्ध करावे. त्यांनी जी भूमिका मांडली ती चुकीची आहे. ती अयोग्य आहे. राजकारण आणि चॅनलचा काहीही संबंध नाही.
नेमकं प्रकरण
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी विलास पाटील हे पात्र साकारलं होतं. त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर #istandwith_KiranMane हा हॅशटॅग चर्चेत आला होता. तसेच स्टार प्रवाह वाहिनीने किरण माने प्रकरणी लेखी स्पष्टीकरण दिलं आहे. गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
देवगड नगरपंचायत निवडणूकीत नितेश राणेंना मोठा धक्का; भाजपने गमावली सत्ता!
“हे आर आर आबांचं रक्त!”, अजित पवारांचा रोहित पाटलांवर कौतुकाचा वर्षाव; सुप्रिया सुळे भावूक
भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा नाना पटोलेंना धक्का
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

