Share

सोयगाव नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेचा डंका; भाजपला बसला जोरदार धक्का..!

Published On: 

औरंगाबाद: सोयगाव मध्ये महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांच्या नेतृत्वाचा विजय झाला असून या निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. सोयगाव नगर पंचायत निवडणुकीत १७ पैकी ११ जागेवर विजय मिळवत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. भाजपला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. विजयाची घोषणा होताच सोयगाव येथील शिवसेना पक्ष कार्यालय सेना भवन येथे फटाक्यांची आतषबाजी, जय भवानी जय शिवाजींच्या जयघोषात जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, किशोर अग्रवाल आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. वॉर्ड क्र. १ मध्ये भाजपचे माजी ( विद्यमान ) नगराध्यक्ष कैलास काळे यांच्या पत्नी कल्पना काळे यांचा दारुण पराभव झाला. या वॉर्डात शिवसेनेच्या शाहिस्ताबी रउफ यांनी जोरदार मुसंडी मारली. तसेच वॉर्ड क्र. ४ मध्ये कैलास काळे यांचे पुतणे संदीप काळे यांचा शिवसेना उमेदवार हर्षल काळे यांच्याकडून दारुण पराभव झाला. शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर काळे यांच्या पत्नी सुरेखा काळे तसेच शहरप्रमुख संतोष बोडखे यांचा दणदणीत विजय झाला आहे.

सोयगाव येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपले खातेही उघडता आले नाही. सोयगाव नगरपंचायतीच्या चार जागांचा निवडणुकीत मंगळवारी १४४५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा आपली सत्ता गमावली आहे. अब्दुल सत्तार यांनी या ठिकाणी आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केले आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा हा मतदारसंघ आहे. मात्र दुसऱ्यांदा याठिकाणी सत्ता मिळवण्यात भाजपला अपयश आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!