जालना: बदनापूर नगरपंचायत निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवत ९ जागेवर निर्विवाद विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५, काँग्रेसने एक तर अपक्षांनी दोन ठिकाणी विजय मिळविलेला आहे. विशेष म्हणजे अपक्ष असलेले दोघेही भाजपचे समर्थक असल्यामुळे आमदार नारायण कुचे(Narayan Kuche) यांनी बदनापूर नगर पंचायतीवर निर्विवाद यश मिळवत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे. भाजपने बदनापूर नगर पंचायतीत निविर्वाद विजय मिळवला असून आता नगराध्यक्षाची माळ कुणाच्या गळयात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बदनापूर नगर पंचायतमध्ये महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवण्याचे ठरवले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत आघाडीने एकत्रित लढत दिली. तर दुसऱ्या टप्प्यात मात्र काँग्रेसने महाविकास आघाडीतून माघार घेत चारही वॉर्डात उमेदवार दिले होते. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी एकत्रित प्रचार केल्यामुळे महाविकास आघाडीने मोठी शक्ती पणाला लावलेली होती. मात्र, भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी ही सर्व व्यूहरचना भेदत महाविकास आघाडीला धोबीपछाड देत नगरपंचायतवर एकहाती सत्ता प्रस्थापिक झाल्याचे चित्र आजच्या निकालात दिसून आले आहे.
सकाळी १० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संदीपान सानप व सहनिवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्या उपस्थितीत मतपेटया (ईव्हिएम) असलेल्या स्ट्राँगरूम उघडण्यात येऊन मतमोजणीस प्रत्यक्ष सुरुवात झाली. यावेळी जसजसे निकाल जाहीर होत होते. तहसील परिसरातील जमा उमदेवार समर्थकात मोठा आनंदोत्सव साजरा होत होता. जसजसे निकाल जाहीर झाले तसतसे भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत कोरोनाचे भान विसरत उमेदवार व समर्थक प्रचंड घोषणाबाजी करताना दिसून येत होते.
महत्वाच्या बातम्या:
बीडमध्ये भाजपच्या विजयानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या, ही लढत मुंडे विरुद्ध मुंडे…
देवगड नगरपंचायत निवडणूकीत नितेश राणेंना मोठा धक्का; भाजपने गमावली सत्ता!
“हे आर आर आबांचं रक्त!”, अजित पवारांचा रोहित पाटलांवर कौतुकाचा वर्षाव; सुप्रिया सुळे भावूक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

