Share

‘मुलगी झाली हो’ मालिकेतील किरण मानेंची जागा घेणार ‘हा’ अभिनेता

Published On: 

मुंबई : ‘मुलगी झाली हो’ ही मालिका आणि विलास पाटीलची भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांच्या बद्दल प्रचंड चर्चा सुरू आहे. मानेंना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या सगळ्यात किरण माने यांनी साकारलेली विलास पाटीलची भूमिका कोण साकारणार याबाबत नवीन माहिती समोर येत आहे.

दरम्यान ‘मुलगी झाली हो’ (‘Mulgi Jhali Ho’) ही मालिका आणि विलास पाटीलची (Vilas Patil) भूमिका साकारणाऱ्या किरण मानेंना अचानक एक दिवस मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. एकीकडे किरण यांनी दावा केला की, त्यांनी वादग्रस्त पोस्ट आणि राजकीय भूमिका घेतल्या म्हणून त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर, दुसरीकडे मालिकेतील महिला सहकलाकारांसोबत ते गैरवर्तवणुक करायचे आणि अपशब्द वापरायचे, यासाठी किरण यांना पूर्वसूचना देण्यात आली होती. पण तरीही त्यांच्यात बदल झाला नाही, म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं, असे निर्माते म्हणाले होते. आता किरण माने गेल्यानंतर विलास पाटीलची भूमिका आता कोण साकरणार असा प्रश्न सगळ्या चाहत्यांना पडला आहे.

https://www.instagram.com/p/CYson8zpDAO/?utm_source=ig_web_copy_link

एका रिपोर्टनुसार, ‘मुलगी झाली हो’ मालिकेत अभिनेता आनंद अलकुंटे (actor Anand Alkunte) विलास पाटीलची भूमिका साकारणार आहे. सध्या तरी याविषयी प्रोडक्शन हाऊसकडून कोणतीच अधिकृत माहिती मिळाली नाही. आनंद याआधी ‘रुद्रम’ मालिकेत पोलिसांच्या भूमिकेत दिसला होता. तसेच ‘बंदिशाळा’, ‘जोगवा’ चित्रपटात भूमिका साकारली आहे. तसंच बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्येदेखील काम केलं आहे. आता तो ‘मुलगी झली हो’ मालिकेत विलास पाटीलच्या भूमिका कशी पार पाडणार आणि तो किरण माने यांची जागा घेऊ शकले का? असे बरेच प्रश्न चाहत्यांना पडले आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!