Share

एकनाथ खडसेंना धक्का; बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा

Published On: 

जळगाव: माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात बोदवड नगरपंचायत आहे, खडसे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) सामील झाल्यानंतर प्रथमच त्यांच्या मतदार संघात या नगरपंचायतीची निवडणूक (Election) झाली.

या निवडणुकीत एकनाथ खडसे यांना चांगलाच धक्का बसला आहे. शिवसेनाचे आमदार चंद्रकांत पाटील (Shivsena MLA Chandrakant Patil) यांनी हा राजकीय धक्का दिला आहे. खडसे यांना धक्का देत बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेने आपला झेंडा फडकावला आहे. त्यामुळे आता बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

या निवडणुकीत एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या रोहिनी खडसे यांनी ताकद लावली होती.तर शिवसेना नेते जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकात पाटील यांनीही जोरदार प्रचार केला होता. शिवसेनेने १७ पैकी ९ जागा जिंकून बहुमत मिळवित सत्ता मिळविली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ ७ जागा मिळाल्या भारतीय जनता पक्षाला देखील यश मिळाले नाही. त्यांचा एक उमेदवार चिठ्ठीवर विजयी झाला आहे. काँग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!