🕒 1 min read
मुंबई: आज पासून वेस्टइंडीचा ३ एकदिवसीय सामन्यांसाठी आणि ३ टी-२० सामन्यांसाठी भारताचा दौरा सुरु झाला आहे. भारत विरुद्ध वेस्टइंडीजचे ३ एकदिवसीय सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर खेळवले जाणार आहेत. हे सामने ६,९ आणि ११ फेब्रुवारी या तीन दिवसात होणार आहेत. आज सुरु झालेल्या पहिल्याच सामन्यात युझवेन्द्र चहलच्या फिरकीसमोर वेस्टइंडीज संघाने शरणागती पत्करली आहे. युझवेन्द्र चहलने आजच्या सामन्यात वेस्टइंडीजचे ४ बळी घेऊन आपले एकदिवसीय सामन्यातील बळींचे शतक पूर्ण केले आहे. वेस्टइंडीज संघाने युझवेन्द्र चहलच्या प्रभावी माऱ्यासमोर शरणागती पत्करत फक्त १७६ धावा केल्या आहेत आणि भारतीय संघासमोर १७७ धावांच लक्ष ठेवल आहे.
त्याने निकोलस पुरन, वेस्टइंडीजचा कर्णधार कायरन पोलार्ड, अलझारी जोशेफ आणि शमर्ह ब्रुक्स यांना बाद करीत आपले एकदिवसीय सामन्यातील बळींचे शतक पूर्ण केले आहे. युझवेन्द्र चहलने ६० एकदिवसीय सामन्यात बळींचे शतक पूर्ण केले आहे.
भारतातर्फे सर्वात जलद एकदिवसीय बळींचे शतक करण्याची किमया मोहंमद शमी याच्या नावावर आहे, त्याने केवळ ५६ सामन्यात आपले एकदिवसीय बळीचे शकत पूर्ण केले होते.एकदिवसीय सामन्यांमध्ये 100 बळींचा टप्पा पूर्ण करणारा चहल हा भारताचा २२ वा गोलंदाज आहे. तर फिरकी गोलंदाजांमध्ये नववा स्पिनर आहे.
महत्वाच्या बातम्या :
- औरंगाबाद येथील बिडकीनला मिळाले ‘ऑक्सिजन’ प्लान्ट; जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले उद्घाटन!
- ‘घरकुल नाही फेककुल’, ‘सपनो का घर सपने में ही मिलेगा’; औरंगाबादेत भाजपविरोधात एमआयएमची बॅनरबाजी!
- भारतीय क्रिकेट संघाची लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
- भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या वडिलांचे निधन
- “सोमय्यांच्या मुद्द्यांचा विरोध गुद्द्याने केला गेला, ही घटना म्हणजे…”, उदयनराजेंनी ‘त्या’ घटनेचा नोंदवला निषेध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
