🕒 1 min read
औरंगाबाद: ‘घरकुल नाही फेककुल’, ‘सपनो का घर सपने में ही मिलेगा’ अशा आशयाचे बॅनर औरंगाबाद शहरात एमआयएमच्या वतीने लावण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील(Imtiyaj Jaleel) यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान घरकुल योजनेबाबत मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. पंतप्रधान घरकुल योजना म्हणजे ‘सपनो का घर सपनो मे ही मिलेगा’ अशी टिका त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद मोदीवर(Narendra Modi) केली होती. आता एमआयएमच्या वतीने शहरात लावण्यात आलेल्या बॅनर्समुळे भाजप आणि एमआयएम यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मार्च २०२२ ला पंतप्रधान आवास योजनेची मुदत संपणार असुन केंद्र, राज्य व जिल्हा प्रशासनाच्या उदासिनता व कार्यपध्दतीवर गंभीर स्वरुपाचे आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केले होते. यात महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गोरगरीब लोकांना सर्व सोयीसुविधायुक्त स्वत:ची पक्की घरे मिळणार असल्याचे जाहीर करुन कोटयावधी रुपयांचे होर्डिंग व जाहीराती लावून शासकीय पैशांचा गैरवापर करुन सर्वसामान्य गोरगरीब नागरीकांची चेष्टा केल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.
देशातील प्रत्येक गोरगरीब कुटुंबाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्च २०२२ पर्यंत सर्वांना जलजोडणी, शौचालयाची व्यवस्था, २४ तास वीज व पोहोचरस्ता या सुविधांसह पक्के घर पंतप्रधान आवास योजनेतंर्गत देणार असल्याचे घोषित केले होते. स्वत:ची घरे मिळणार या आशेने वर्ष २०१६ मध्ये औरंगाबाद शहरातील ८०५१८ गोरगरीब नागरिकांनी कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने महानगरपालिकेकडे अर्ज सादर केले. गेल्या सात वर्षामध्ये जिल्हा प्रशासनाने फक्त ३५५ लाभार्थी म्हणजे एक टक्क्यापेक्षा कमी लाभार्थीयांना घर दुरुस्तीसाठी लाभ दिला.
हि बाब शहरासाठी लाजीरवाणी असुन घरकुल योजने संदर्भात केंद्र, राज्य व जिल्हा प्रशासनावर अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप जलील यांनी केले होते. जलील यांचा या आरोपानंतर भाजपला या योजनेचे श्रेय मिळू नये यासाठी महाविकासआघाडी शहरात या योजनेसाठी जागा मिळू देत नसल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला होता. हर्सूल टी पॉइंट, कलेक्टर ऑफिस सर्कल, रोशन गेट, दमडी महल, भडकल गेट, सिटी क्लब सर्कल शहरातील याठिकाणी एमआयएमने बॅनर झळकवले आहेत. यावरून आता आणखी वाद उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
