Share

“सोमय्यांच्या मुद्द्यांचा विरोध गुद्द्याने केला गेला, ही घटना म्हणजे…”, उदयनराजेंनी ‘त्या’ घटनेचा नोंदवला निषेध

Published On: 

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांनी धक्काबुक्की केल्याचा गंभीर प्रकार पुण्यात काल दि. ५ फेब्रुवारी रोजी घडला. किरीट सोमय्या शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पुण्यात आले होते. दरम्यान किरीट सोमय्या पुण्यात येताच पुणे शहरातील शिवसैनिकांनी चांगलाच राडा घातला. यामध्ये किरीट सोमय्यांना धक्काबुक्की झाल्याने सोमय्या जखमी झाले असून ते शहरातील संचेती रुग्णालयात उपचार घेत आहेत. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दवाखान्यात जाऊन किरीट सोमय्या यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी झालेल्या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला.

https://www.facebook.com/Chh.UdayanrajeBhonsleOfficial/photos/pcb.2278339358971894/2278339232305240

 

खासदार उदयनराजे म्हणाले, ‘माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने भ्रष्टाचाराची पोल खोलत असल्याने त्यांचेवर झालेला प्राणघातक ठरणारा हल्ला अतिशय निंदनिय आहे. सोमय्यांच्या मुद्यांचा विरोध गुद्याने केला गेला असल्याने, लोकशाही संकटात सापडली आहे. असा हल्ला करुन, मा.किरीट सोमय्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. ही घटना म्हणजे वैचारिक महाराष्ट्रातील लोकशाहीची अधोगती आणि झुंडशाहीची नांदी आहे. देशातील कोणत्याही व्यक्तीवर अश्या हल्याच्या घटना घडल्यास अश्या घटनेचे कोणीही समर्थन करु शकणार नाही.’ असे उदयनराजे म्हणाले.

नेमकं काय घडलं?

किरीट सोमय्या पुण्यात आल्यावर ते पुण्याचे आयुक्त विक्रम कुमार यांना भेटण्यासाठी पुणे महानगगरपालिका भवनात गेले असताना शहरातील हजारो शिवसैनिक आक्रमक झाले. किरीट सोमय्या पुणे महानगरपालिका भवनात येणार हे कळताच शहरातील हजारो शिवसैनिक पुणे महानगरपालिका इमारतीच्या परिसरात जमले. यावेळी शिवसैनिक किरीट सोमय्या यांच्या अंगावर धावून गेले असता किरीट सोमय्या पुणे मनपा भवनाच्या पायऱ्यांवर पडले आणि त्यांना किरकोळ जखमही झाली आहे. पुणे महानगरपालिकेतील शिवसैनिकांचा हा राडा जवळपास ५ ते १० मिनिट सुरु होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!