मुंबई : भारती क्रिकेट संघ आज आपला १००० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळत आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर हा वेस्टइंडीज विरुद्धचा एकदिवसीय सामना होणार आहे. त्यातच आज भारतीय कला क्षेत्रातून एक वाईट बातमी आली. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज मुंबई शहरातील ब्रीच कॅंडी या रुग्णालयात न्यूमोनियामुळे निधन झाले. त्या ९३ वर्षाच्या होत्या. आज सकाळी लता मंगेशकर यांचे निधन झाल्याची बातमी कळल्यावर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि तडाखेबाज फलंदाज विराट कोहली याने ट्विटर वरून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
विराट कोहलीने ट्विट करत म्हंटले आहे कि, ” लता मंगेशकर यांच्या जाण्याने अतीव दुःख झाले आहे. त्यांच्या मंत्रमुग्ध गाण्याने जगातील लाखो जणांच्या हृदयात घर केलं होत. विराट कोहलीने लतादीदींचे भारतीय संगीत क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार देखील मानले आणि मंगेशकर कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. तर आपला १००० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने वेस्टइंडीज विरुद्ध सुरु होणाऱ्या सामन्याआधी आपल्या डाव्या हाताच्या दंडाला काळी पट्टी बांधून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
तर वेस्टइंडीज विरुद्धचा एकदिवसीय सामना सुरु झाल्यावर मैदानातील भारतीय राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणला जाणार आहे. भारत सरकारने लता मंगेशकर यांच्या निधनानंतर २ दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून महाराष्ट्र सरकारने सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. लता मंगेशकर यांचे निधन झाल्यावर अनेक क्रिकेट खेळाडूंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- नातवंडांना सांगु “आम्ही लतादीदी नावाच्या सरस्वतीच्या अवताराला प्रत्यक्ष पाहिलं”-सलील कुलकर्णी
- ‘उद्धव ठाकरेंवर हत्येचा गुन्हा दाखल करणार’; किरीट सोमय्यांचा इशारा
- कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले-खा. सुप्रिया सुळे
- बाळासाहेबांनंतर लतादीदी आमच्या आधार होत्या, रश्मी ठाकरे भावुक!
- हॉलीवूडमध्ये दिसली होती लतादीदींच्या गाण्याची झलक; ‘या’ चित्रपटात वाजली होती गाणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

