Share

Rishabh Pant | ऋषभ पंतसाठी पाकिस्तानी खेळाडूंनी केली प्रार्थना, सोशल मीडियावर केल्या पोस्ट शेअर

Published On: 

🕒 1 min read

Rishabh Pant | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्या कारचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातामध्ये त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. तो सध्या धोक्याबाहेर असला, तरी त्याच्या जखमा गंभीर आहेत. भारतातील प्रत्येक जण त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहे. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तान खेळाडूंकडूनही रिषभच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या जात आहे.

ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर पाकिस्तानमधील अनेक खेळाडूंनी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये शोएब मलिक, मोहम्मद हाजीफ, हसन अली इत्यादी खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर ऋषभ पंतच्या तब्येतीसाठी जगभरात प्रार्थना केल्या जात आहे.

शोएब मलिकने ट्विट करत रिषभ पंतच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. यामध्ये तो म्हणाला आहे की,”आत्ताच ऋषभ पंतच्या अपघाताची माहिती मिळाली आहे. तुझ्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. लवकर बरा हो.” त्याचबरोबर हसन अलीने ट्विट करत लिहिले आहे की,”मला आशा आहे की ऋषभला काहीही गंभीर झाले नसावे. तू लवकर बरा व्हावा अशी आमची इच्छा आहे. तू लवकर बरा होऊन मैदानात परतशील.” त्याचबरोबर अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी ट्विटरच्या माध्यमातून त्याला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्या आहेत.

दिल्लीहून घरी परतताना ऋषभ पंतच्या कारचा हा अपघात झाला होता. हम्मादपुर झाल जवळ रुरकीच्या नरसन सीमेवर वळण घेत असताना त्याच्या कारचा अपघात झाला. गाडी चालवताना झोप लागल्यामुळे त्याचा हा अपघात झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंत गाडी चालवत असताना त्याला अचानक डुलकी लागल्याने त्याचा हा अपघात झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!