Share

औरंगाबाद येथील बिडकीनला मिळाले ‘ऑक्सिजन’ प्लान्ट; जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले उद्घाटन!

Published On: 

औरंगाबाद: बिडकीनच्या ग्रामीण रुग्णालायात उपचारासाठी खेड्यापाड्यातील रुग्ण येत असतात. या रुग्णालयात बालरोग विभाग, प्रसुती कक्ष तसेच कोविड बाधितांवर उपचार केले जातात. यामध्ये ग्रामीण भागतील रुग्णांना आरोग्य सुविधा सहज आणि तत्पर मिळण्यासाठी पीएस.ए.प्लांट पूरक ठरणार असल्याचे प्रतिपादन बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील पीएसए प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी संगीता सानप, पैठणचे तहसीलदार दत्तात्रय निलावड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे यांची उपस्थिती होती. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून वाळूज येथील कॅनपॅक इंडिया प्रा.लि. यांच्याकडून उभारण्यात आलेल्या जीवनावश्यक वैद्यकीय ऑक्सीजन प्लांटची उभारणी बिडकीन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. या प्लांटचा फायदा ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना शासकीय रुग्णालयात उपचारार्थ आलेल्यासाठी होणार आहे.

तात्काळ वैद्यकीय मदत म्हणून ऑक्सिजनची उपलब्धता करण्यासाठी रुग्णालय आवारातच प्रतिमिनिट १५८ लिटर क्षमता असणाऱ्या प्लांटमधून ऑक्सीजनची निर्मिती होत आहे. आज बिडकीन येथील ग्रामीण रुग्णलायात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने येथेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊन आरोग्य सुविधेत भर टाकणारा आणि आरोग्यास पुरक ठरेल. हा प्लांट मधून रुग्णांना उपचारासाठी लागणारा ऑक्सिजन बाहेरुन विकत न घेता मोफत उपलब्ध झाल्याने आरोग्याच्या सुविधेसाठी साह्यभूत ठरेल. असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!