🕒 1 min read
मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (२९ जून) फेसबुक लाईव्ह येत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राजकीय तसेच मनोरंजन क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. आता यामध्येच मराठीमधील प्रसिद्ध अभिनेता-लेखक हेमंत ढोमेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत भावनिक ट्विट केलं आहे.
हेमंत ढोमणे त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्याने लिहिले की, “धन्यवाद उद्धव ठाकरे. तुमचा संपुर्ण प्रवास सहजसुंदर आणि निर्मळ होता. करोनाकाळात आपण कुटुंबप्रमुख म्हणून आमची काळजी घेतली. आज आपल्याला मुख्यमंत्री म्हणून अलविदा म्हणताना खरंच वाईट वाटतंय. धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब! तुम्ही कायम लक्षात राहणार…” सध्या हे ट्विट खूप चर्चेत आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
Thank you @OfficeofUT !!!
तुमचा संपुर्ण प्रवास सहजसुंदर आणि निर्मळ होता… कोरोनाकाळात आपण कुटुंबप्रमुख म्हणुन आमची काळजी घेतली… आज आपल्याला मुख्यमंत्री म्हणुन अलविदा म्हणताना खरच वाईट वाटतंय… धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब! तुम्ही कायम लक्षात राहणार! #thankyou #UddhavThackarey #CM— Hemant Dhome | फसक्लास ढोमे (@hemantdhome21) June 29, 2022
सोशल मिडीयावर अनेक भावून पोस्ट कालपासून पहावयास मिळत आहेत. तरुण पिढीकडून अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. ज्यात उद्धव ठाकरेंच्या बाजूने असलेला एक गट दिसून येत आहे. राजकारणातील या घडामोडी इतिहासात कायम स्मरणात ठेवल्या जातील. काल या सर्व घडामोडीनंतर भाजपकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. तर भाजपच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार स्थापन होण्याचा दावाही केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
