Share

“चित्रपटात काम करण्यासाठी तुम्हाला चार लोकांसोबत राहावं लागेल”, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट २० मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांनी या चित्रपटामध्ये अभिनय केला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल १४ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाला एवढं प्रेम दिल्याबद्दल कार्तिकने चाहत्यांचे आभार मानले आहेत. आता या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी कार्तिक आर्यनने एनजीओच्या मुलांसाठी खास स्क्रीनिंग आयोजित केले आहे.

अभिनेत्री सुलेखा तळवळकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये अर्चना नेवरेकर यांनी चित्रपटसृष्टीतील जुन्या आठवणी सांगितल्या. त्यावेळी त्या म्हणाल्या, “ज्यावेळी मी शूटींगला जायची तेव्हा माझ्यासोबत माझी बहिण सुप्रिया पाठारे यायची. यामधूनच तिला अभिनय करण्याची संधी मिळाली. मला चार बहिणी होत्या. मी पाच ते सहा वर्षाची असताना माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे मला मोठ्या कष्टाला सामोरे जावे लागले.”

“मी माझ्या करिअर मध्ये सुपरस्टार होते असे नाही. मी चित्रपटसृष्टीत खूप छोट्या पात्रांची भूमिका साकारली आहे. नंतर माझी हळूहळू ओळख निर्माण होऊ लागली. माझी एका खूप मोठ्या हिंदी चित्रपटासाठी निवड झाली. मी त्या चित्रपटाच्या नावाचा उल्लेख करणार नाही कारण त्याचे परिणाम खूप वाईट होतील”. असं त्या म्हणाल्या.

चित्रपटासाठी दोन मुलींची निवड झाली. पण चित्रपटात काम करायचे असेल तर तुम्हाला चार दिवस या चार लोकांसोबत राहावं लागेल अशी अट त्यांनी घातली होती. मला ही अट अजिबात मान्य नव्हती. पण माझ्यासोबत दुसरी जी मुलगी होती तिने ही अट मान्य केली आणि सध्या ती टॉपला आहे.

दरम्यान अर्चना नेवरेकर यांनी त्यांच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःची ओळख बनवली. वासूची अर्चना हे त्यांचे पहिले नाटक आहे. पुढे त्यांनी फुलराणी, जन्मदाता, स्वप्न सौभाग्याचे , सुना येती घरा, वहिनीची माया अशा वेगवेगळ्या नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!