Share

“पैसे बुडवायचे म्हणून सदाभाऊ राष्ट्रवादीला…” ; उधारी प्रकरणी हॉटेल मालकाचा खुलासा

Published On: 

सोलापूर : सदाभाऊ खोत यांनी जेवणाचे बिल दिले नाही, म्हणून ढाबामालक अशोक शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला होता. त्यानंतर अशोक शिंणगारे यांच्यावर सदाभाऊ खोत यांच्या निकटवर्तीयाकडून पोलिसात तक्रार देण्यात आली. तसेच शिंणगारे यांच्यावर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करण्यात आला. या सर्व आरोपावर आणि सदाभाऊकडे उधार असलेल्या बिलाबाबतच्या माहितीविषयी अशोक शिनगारे यांनी माहिती दिली आहे.

“पैसे बुडवायचे म्हणून सदाभाऊ राष्ट्रवादीला मध्ये आणत आहेत. पण मी राष्ट्रवादीचा नव्हे तर शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे. मला माझ्या ढाब्याचे 66 हजार रुपये बिल द्या,” असे अशोक शिनगारे यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण ?

हॉटेलमध्ये पार्टी केल्यानंतर बिल न दिल्याने शेतकरी नेते सदाभाऊ खोतांचा ताफा अडवण्यात आला होता. सदाभाऊ खोत सोलापूर जिल्ह्यात एका कार्यक्रमासाठी गेले असता असा अजब प्रकार घडला. या मालकाने सदाभाऊ खोतांच्या ताफ्यासमोर मोठा गोंधळ घातला होता. सदाभाऊंसोबत घडलेल्या या प्रकारामुळे राज्यभरात त्यांची चर्चा होत आहे. या प्रकारानंतर सदाभाऊ खोत यांनी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव असल्याची टीका केली होती.

काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?

“ह्या घटनेमागची सत्यता पडताळता डोळ्यासमोर जे आलं ते मात्र अवस्थ राजकीय वातावरणातून कुणीतरी केलेलं षडयंत्र असल्याचं उघड झालं. ह्या प्रकरणात जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या टोमॅटो सारख्या गालांच्या नेत्याच्या सांगण्यावरून या हॉटेल मालकाने बनाव केला, असे खोत म्हणाले.

“३/४/२०२१ रोजी लिमिटेशन ऍक्ट खाली हॉटेल मालकावर एक गुन्हा दाखल आहे. महाकाली सहकारी साखर कारखाना कवठे महाकाळ चा IPC १३८ खाली गुन्हा दाखल आहे. जयहिंद पतसंस्थेचा IPC १३८ खाली गुन्हा दाखल आहे. असे तब्बल सहा सात गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तो वाळूमाफिया आहे. तो दारूविक्रेता आहे, ही सगळी माहिती समोर आली. हा राष्ट्रवादीचा भामट्या एवढयावरच थांबला नसून त्याने सिद्धू शिंदे, रा. काळेवाडी, ता आटपाडी, जि. सांगली यांच्या बँगलोर येथील सोन्याच्या दुकानातून १४ किलो सोने चोरल्या बद्दल देखील गुन्हा नोंद आहे.”

“पोलिसांनी या व्यक्तीची कसून चौकशी करून त्याची मागील गुन्हेगारी प्रवृत्ती तपासून त्यावर तात्काळ कारवाई करावी. परंतु पोलीस देखील गुन्हा नोंद करायला तयार नसल्याचे लक्षात आल्यावर त्याच्या मागे कुणाचा तरी हात आहे, हे लक्षात आले. राष्ट्रवादीकडून सततच्या होणाऱ्या हल्ल्याबाबत आपण याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी करून खऱ्या सूत्रधाराचा चेहरा जनतेसमोर आणणार. तसेच राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबियांकडून मला धोका आहे, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

“तुम्ही असे हल्ले करून आणि कुभांड रचून आम्हाला जीवनातून उठवू शकत नाही. हा संघर्ष आता तीव्र होईल आणि गावगाड्यातील माणसांना एकत्र घेऊन ह्याचं जशास तसं उत्तर दिलं जाईल. गुन्हेगारांना पुढे घालून जर हल्ला कराल तर सदाभाऊ खोत त्याच्या बापांचा बाप आहे. भविष्यात ‘आरे ला कारे’ म्हणूनच उत्तर दिले जाईल,” असा इशारा देखील सदाभाऊंनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!