अहमदनगर : कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर आपण गेली तीन चार महिने गाफील राहिलो. बेजबाबदारपणे वागल्यामुळेच कोरोनाची दुसरी लाट घातक ठरत आहे. आताच आपण जबाबदारीने वागलो, तर जुलै ऑगस्टमध्ये येणारी करोनाची तिसरी लाट घातक ठरणार नाही, असे आवाहन नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ शुक्रवारी श्रीरामपूर दौऱ्यावर आले असता विश्रामगृहावर अधिकारी, पदाधिकाऱ्यांबरोबर कोरोबाबतचा आढावा घेतला. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहू कानडे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अविनाश आदिक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुश्रीफ म्हणाले, खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर बिल आकारले जात असून त्यांच्या बिलाचे ऑडीट झाले पाहिजे. अशा रुग्णालयांवर अंकुश ठेवले पाहिजे. त्यामुळे नगरला उपचारासाठी जाणारे कमी होऊन शिर्डी उपचार घेऊ शकतील. कोरोनाच्या काळात ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असून जिल्ह्यात नगर, संगमनेर आणि श्रीरामपूर येथे ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली जाणार आहे.
श्रीरामपूर येथे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार आहे. शिर्डी येथे लवकरच २ हजार बेडचे जम्बो कोविड रुग्णालय सुरू होणार आहे. यात २०० बेड, व्हेंटीलेटर आयसीयू सुविधा, १ हजार बेड ऑक्सिजन सुविधा असणार आहे. या रुग्णालयामुळे सहा तालुक्यातील रुग्णांची मोठी व्यवस्था होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- मैत्रीच्या नात्याला काळिमा! फोटो डिलिट करण्याच्या बहाण्याने बोलावून मित्राच्या पत्नीवर अत्याचार
- धक्कादायक! रुग्णालय कर्मचाऱ्यांनी कोरोना बळीच्या खिशातील पैसे काढले, पाच जणांवर गुन्हा
- करावे काय? आर्थिक उत्पन्न नाही, कर्ज घ्यावे तर चारपट व्याजदर
- ‘कोरोना रोखण्यास योगी सरकार अपयशी’, भाजप आमदाराकडून घरचा आहेर
- …आणि काईन जेमिनसलने नेटमध्ये विराटला गोलंदाजी करण्यास दिला नकार
- धक्कादायक बातमी : माजी सैनिकाचा कोल्हापुरात ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू


